Home चंद्रपूर राजू रेड्डी यांच्या घराजवळ खाजगी खोलीत आढळलेल्या त्या किट्स स्वस्त धान्य दुकानदारांच्या...

राजू रेड्डी यांच्या घराजवळ खाजगी खोलीत आढळलेल्या त्या किट्स स्वस्त धान्य दुकानदारांच्या ताब्यात,

राजू रेड्डी यांच्या सरकारी धान्याची वाटप मोहीम थंड बस्त्यात ? दुसऱ्याचा मालावर चमकोगिरीचा अखेर अंत !

घूग्गूस प्रतिनिधी :-

पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या तर्फे कुणी ही अन्ना शिवाय उपाशी राहता कामा नये याकरिता जिल्ह्याभरात 40, 000 अनाज किट गरजवंत तसेच ज्यांच्याकड़े रेशनकॉर्ड नाही अश्या नागरिकांना पोहचवण्यासाठी तालुक्यातील तहसीलदार यांच्यामार्फत वाटप करण्याचे ठरले होते, यामधे काही स्वयंसेवी संस्था व सामाजिक राजकिय संघटना यांच्या मार्फत सुद्धा गरीब गरजू व ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांना देण्याची व्यवस्था होती. मात्र आगोदरच राजू रेड्डी यांचेवर घूग्गूस येथील महिलांनी अन्नधान्याची अफरातफर करण्याचा आरोप लावल्याने त्यांच्याच घरा जवळील खोलीत जर अन्नधान्याच्या किटस ठेवलेल्या आढळल्या तर तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी राजू रेड्डी यांच्यावर विश्वास ठेवला कसा ? आणि यामधे काय सेट्टिंग आहे ? हे कळायला मार्ग नसून जे खरोखरच गरीब गरजू आहे त्यांच्यापर्यंत ह्या किट्स पोहचवीने महत्वाचे आहे,  आणि राजू रेड्डी यांच्याविरोधात घूग्गूसमधे असंतोष असल्याने त्यांच्या मार्फत ह्या किट्स वाटप करणे म्हणजे जणू प्रशासनाचा सावळा गोंधळ आहे असे दिसते.

खरं तर कॉंग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश देवतळे यांनी स्वतः घूग्गूस येथे जावून परिस्थिती हाताळली पण ज्याअर्थी स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर तेथील जनतेचा विश्वास नसेल तर शासकीय यंत्रणेमार्फत अन्नधान्याची किट्स वाटप करणे आवश्यक आहे. कारण तसे शासनाचे निर्देश आहे की स्वस्त धान्य दुकानदारांमार्फतच शासकीय यंत्रणेकडून येणारे अन्नधान्य वाटप करायचे, मग ज्या राजू रेड्डी यांच्यावर अगोदर सिमेंट बैग चोरीचा आरोप आहे, एवढेच नव्हे तर घूग्गूस येथील महिलांनी सुद्धा त्यांच्यावर वेकोलिकडून आलेल्या अन्नधान्याची अफरातफर करण्याचा आरोप केलेला होता, तरीही तहसीलदार यांनी ह्या अन्नधान्याच्या किट्स कशा काय त्यांच्या हवाली केल्या ? हा प्रश्न आता राजकिय रंग घेत असून गरीब गरजू व ज्यांच्याकडे खरोखरच अन्नधान्य नाही त्यांना अन्नधान्याच्या किट्स मिळण्यासाठी आता स्वतः तहसीलदार यांनी ठोस पाऊले उचलले असून राजू रेड्डी यांच्या घराजवळील खोलीत मिळालेल्या त्या अन्नधान्याच्या किट्स आता स्वस्त धान्य दुकानदारांच्या स्वाधीन करून राजू रेड्डी यांची फुकटात अन्नधान्य वाटप करण्याची मोहीम थंड बस्त्यात गेली असून त्यांच्या चमकोगीरीला आळा बसला असल्याचे चर्चेतून बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here