Home चंद्रपूर गरीब मजुरांच्या मदतीसाठी शिवसेना सरसावली, दररोज १०० ते १५० मजुरांना जीवनावश्यक वस्तूंच्या...

गरीब मजुरांच्या मदतीसाठी शिवसेना सरसावली, दररोज १०० ते १५० मजुरांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स वाटप !

जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे व शहर प्रमुख प्रमोद पाटील यांचा पुढाकार, कोरोना च्या ह्या संकटात सर्व सामाजिक राजकिय संघटना सोबतच शिवसेनाही मैदानात !

चंद्रपूर प्रतिनिधी :

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज सर्व सामाजिक राजकिय संघटना एकत्र येत गरजू नागरिकांना पुढे येवून मदत करीत आहे. अशातच देश व राज्य लॉकडाउन असताना मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे त्यासाठी शहर शिवसेनेने जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली गरजू नागरिकांना किराणा किट चे वाटप करण्यात येत आहे. दररोज 100 ते 150 नागरिक शिवसेनेच्या या उपक्रमाचा लाभ घेत आहे.
शहरातील प्रत्येक प्रभागात शिवसेना गरजू नागरिकांसोबत असून गरज पडेल तेव्हा आम्ही नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहू असे मत शहर प्रमुख प्रमोद पाटील यांनी व्यक्त केले.
या उपक्रमात युवा सेना जिल्हा समनव्यक निलेश बेलखेडे, उपशहर प्रमुख प्रकाश चंदनखेडे, वसीम खान, सिकंदर खान, स्वप्नील काशीकर, राहुल विरुटकर, संतोष नरुले, सूरज घोंगे, सूचित पिंपलशेंडे, अक्षय अंबिरवार, शंकर यादव आदी सहभागी होते.

Previous articleउत्कृष्ट कार्य :-चंद्रपूर महाराष्ट्र सैनिकांची निस्वार्थ भावनेने गरजूना जीवनावश्यक वस्तूंची मदत !
Next articleकांग्रेस कमेटी पर्यावरण विभाग के जिल्हाध्यक्ष दिलीप पल्लेवार इनका जबरदस्त उपक्रम !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here