Home चंद्रपूर उत्कृष्ट कार्य :-चंद्रपूर महाराष्ट्र सैनिकांची निस्वार्थ भावनेने गरजूना जीवनावश्यक वस्तूंची मदत !

उत्कृष्ट कार्य :-चंद्रपूर महाराष्ट्र सैनिकांची निस्वार्थ भावनेने गरजूना जीवनावश्यक वस्तूंची मदत !

कुठेही सामाजिक प्रसारमाध्यमांमधे फोटो नाही की इतर कुठेही वाच्यता नाही ! पण तब्बल ११ दिवस सतत मदतकार्य सुरू !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कोरोना व्हायरस संकटाला हद्दपार करण्यसट देशात लॉक डाऊन केल्यानंतर परप्रांतीय कामगार व स्थानिक रोजंदारीवर काम करणारे मजूर यांच्या खाण्यापिण्याच्या समस्या एवढ्या निर्माण झाल्या की त्यांना सामाजिक राजकिय संघटना कडून जरा मदत कार्य मिळालं नसतं तर कोरोना व्हायरस च्या म्रुतकापेक्षा अशा स्थितीत असलेल्या गरीब कामगार मजूर यांच्या म्रूतकाचा आकडा वाढला असता. पण आपल्या देशात अतिथी देवो भव असे म्हटल्या जाते त्यामुळे कुठलाही व्यक्ती संकटात सापडला तर त्याला अनेक मदतीचे हात समोर येतात,

चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा हजारो गोरगरिबांना व लॉक डाऊन मधे अडकलेल्याना येथील अनेक कामगार मजुरांना, सामाजिक राजकिय व धार्मिक संघटना मदत करण्यसट पुढे येत आहे. यामधे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने कुठलीही पब्लिसिटी न करता गरीब गरजू लोकांना सतत ११ दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करीत आहे. आतापर्यंत एक हजार किलो पेक्षा जास्त अनाज व किराणा मनसे तर्फे वाटप करण्यात आला असून आता सुद्धा सतत हे मदत कार्य सुरू आहे.
खरं तर महाराष्ट्रावर जेंव्हा जेंव्हा संकट आलं तेंव्हा तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आपली सामजिक बांधिलकी जोपासूण अडचणीत आलेल्याना नेहमीच मदत केली आहे. मग महाराष्ट्रात दुष्काळ पडला त्यावेळी चारा छावण्या निर्माण करण्याचे असो की शेतकऱ्यांना, कामगारांना, विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे कार्य असो मनसे नेहमीच पुढे आहे. आणि म्हणूनच पक्षांच्या या ध्येय धोरणाच्या अनुषंगाने चंद्रपूर मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष सचिन भोयर, शहर अध्यक्ष मनदीप रोडे. मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, तालुका अध्यक्ष विवेक धोटे, प्रकाश नागरकर , नितीन पेंदाम,, नितीन टेकाम व असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी या मदत कार्यात कुठलीही पब्लिसिटी न करता व फोटोशेषन न करता मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना अभिप्रेत कार्य केल्याने त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होतं आहे. लॉकडाऊनची स्थिती जोपर्यंत राहील तोपर्यन्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे मदत कार्य असेच सुरू राहणार असल्याचे मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी कळविले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here