Home चंद्रपूर खळबळजनक :- नायब तहसीलदार धांडे यांच्यावर ईरई नदीतून रेती तस्करी करणाऱ्यांचा हल्ला,...

खळबळजनक :- नायब तहसीलदार धांडे यांच्यावर ईरई नदीतून रेती तस्करी करणाऱ्यांचा हल्ला, वडा रेती घाटात रेती तस्करी करणारे मोकाट ..

.शाबीर सीद्दीकी आणि जहांगीर सीद्दीकी या रेती माफिया विरोधात शहर पोलिस स्टेशन मधे गुन्हे दाखल ! वडा रेती घाटावर रेती तस्करावर पोलिस कारवाई कधी ?

रेती चोरी भाग -५  :-

जिल्ह्यात रेती माफीयांनी थैमान घातले असून घूग्गूस पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडा रेती घाटावर दिनांक 19 जूनला रेती माफिकडून पैसे मागितल्याच्या नावाखाली प्रिया झामरे या महिलेविरोधात दिनांक23 जून ला घूग्गूस पोलिस स्टेशन मधे गुन्हे दाखल करण्यात आले मात्र मुख्य आरोपी रेती माफिया यांच्यावर महसूल विभागाने गुन्हे दाखल केले नसल्याने जिल्ह्यात महसूल विभागाविरोधात आक्रोश असताना आता खुद्द रेती माफीयांनीच महसूल विभागाच्या नायब तहसीलदार राजू धांडे यांच्यावर प्राणघातक हमला केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आज सकाळी जमजंट्टी जवळील ईरई नदीच्या पात्रात काही रेती माफिया उत्खनन करीत असल्याची माहिती नायब तहसीलदार धांडे याच्या पथकाला मिळाली असता ते घटणास्थळी गेले तेंव्हा नदी पात्रात चार टॅकटर रेती उपसा करताना आढळून आले. त्यातील साबीर सीद्दीकी आणि जहांगीर सीद्दीकी या रेती माफियानी नायब तहसीलदार यांच्यावर हल्ला केलाची माहिती असून शहर पोलिस स्टेशन येथे तहसीलदार यांच्यातर्फे तक्रार देण्यात आली आणि त्या तक्रारीवरून आरोपी साबीर सीद्दीकी आणि जहांगीर सीद्दीकी यांच्यावर कलम 353,332,186,506 व 35 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

आतातरी जिल्हाधिकारी यांनी घूग्गूस येथील रेती माफिया विरोधात कडक कारवाई करणे आवश्यक आहे. कारण तेथील रेती माफिया हे कोट्यावधी रुपयाची रेती चोरी केल्यानंतर सुद्धा प्रशासनावर आताही दबाव बनवून असून खुलेआम प्रशासनाला ललकारीत असल्याने अधिकारी यांच्यावर हल्ला करू शकतात अशी शक्यता आहे.

Previous articleचिंताजनक :- शासनाचा महसूल बुडविण्यास जबाबदार असणाऱ्या तहसीलदार गौडचे रेती माफियांना अभयदान ?
Next articleकेंद्र शासनाच्या पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here