Home चंद्रपूर महत्वाची बातमी :-चंद्रपूर शहरात 17 ते 20 पर्यंत लॉकडाऊन,जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार...

महत्वाची बातमी :-चंद्रपूर शहरात 17 ते 20 पर्यंत लॉकडाऊन,जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची घोषणा. 

जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येने जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय. लग्न व समारंभावर बंधने आणण्यात येणार;

चंद्रपूर,दि.१५ जुलै:

शहरांमध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, येत्या 17 जुलै ते 20 जुलै या चार दिवसांच्या काळात पूर्णटाळेबंदी (लॉकडाऊन) केली जाणार आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसह सर्वदुकाने बंद असतील.ही टाळेबंदी केवळ चंद्रपूर शहरासाठी मर्यादित असेल.त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातीत उर्वरित ग्रामीण भागातील नागरिकांनी 17ते 20 जुलै या काळात चंद्रपूर शहरात येऊ नये, चंद्रपूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.

आजच्या व्हिडिओसंदेशाच्याद्वारे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना संस्थात्मक अलगीकरणातराहणे बंधनकारक आहे. नागरिकांनी माहिती लपविल्यास तसेच प्रशासकीय कामात अडथळाआणल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनीअत्यावश्यक असल्यास बाहेर पडावे. मास्कचा वापर अनिवार्य असून योग्य पद्धतीने मास्कवापरले जावे. तसेच दैनंदिन काम करीत असतांना सुरक्षित अंतर ठेवून काम करावे, असेआवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये लग्न समारंभामुळे बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लग्न व समारंभ करण्यासाठी अनेक बंधने टाकली जातील असे त्यांनी स्पष्ट केले.नागरिकांनी लग्न व अन्य समारंभाचेआयोजन काही काळासाठी पुढे ढकलावे असे आवाहनही त्यांनी केले.चेक पोस्टवर तपासणी आणखी कठोर करण्यात आली आहे. तपासणीच्या वेळेस नाव, मोबाईलनंबर, पत्ता देणे अनिवार्य असणार आहे. जिल्ह्यामध्येबाधितांवर योग्य उपचार केले जात असून सर्व वैद्यकीय सोयी सुविधा कोविड केअर सेंटरमध्ये पुरविल्या जात आहे.जिल्ह्यात एकहीबाधितांचा मृत्यू झालेला नाही ही बाब समाधानाची आहे. लक्षणे आढळून आल्यास तात्काळआरोग्य विभागाला माहिती देऊन तपासणी करणे गरजेचे आहे.कोणतीही अडचण,तक्रार व माहितीद्यायची असल्यास टोल फ्रि क्रमांक 1077 किंवा 07172-261226 या क्रमांकावर संपर्कसाधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000

Previous articleधक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या २०० पार, पुनः जिल्ह्यात ६ रुग्णाची भर,
Next articleबक्षीस दिल्याच्या नावाखाली जमिनीचा बळजबरी ताबा घेणाऱ्या झाडे व तलाठी मेश्राम वर कारवाई करा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here