Home चंद्रपूर कोरोना अपडेट :- आज जिल्ह्यात पुन्हा 18 कोरोना बाधित आले समोर, एकूण...

कोरोना अपडेट :- आज जिल्ह्यात पुन्हा 18 कोरोना बाधित आले समोर, एकूण संख्या पोहचली 294 वर.

जिल्ह्यातील नागरिकांनी आता अधिक काळजी घेणे गरजेचे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे आव्हान !

चंद्रपूर :-

जिल्ह्यात मागील काही दिवसातच कोरोना बाधिताचा आकडा हा तीनशे चा पल्ला गाठायच्या उंबरठय़ावर असून २ मे रोजी एक रुग्ण संख्या आता दिनांक 20 जुलै ला 294 वर पोहचली आहे. मूल तालुक्यातील राईस मिल मधे बाहेरून आलेल्या तब्बल 24 मजुरांना कोरोना ची लागण झाली असून राज्य राखीव दलाच्या जवानांची संख्या सुद्धा मोठी असल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यानी प्रसारमाध्यमांना देवून आज 20 जुलै ला 18 पुन्हा कोरोना बाधित रुग्ण मिळाल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. जिल्ह्यात कडक लॉक डाऊन मधे सुद्धा बाधित वाढत असल्याने प्रशासनाची झोप उडाली असून जिल्ह्यातील नागरिकांनी आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतःहून पुढे येवून बाहेरून येणाऱ्या व ज्यांच्यामध्ये कोरोना चे लक्षण दिसेल त्यांची माहिती जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाला कळवावी असे आव्हान त्यांनी केले . .

Previous articleचिंताजनक :- चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी पुनः १६ नव्या कोरोना बाधितांची नोंद जिल्ह्यातील आकडा पोहचला २७६ वर ..
Next articleगडचांदूर जनता कर्फ्यू आवाहन करताच माणिकगड कंपनी ने का दिले अध्यक्ष उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यला आमंत्रण ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here