Home लक्षवेधी गडचांदूर जनता कर्फ्यू आवाहन करताच माणिकगड कंपनी ने का दिले अध्यक्ष...

गडचांदूर जनता कर्फ्यू आवाहन करताच माणिकगड कंपनी ने का दिले अध्यक्ष उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यला आमंत्रण ?

गडचांदूर विशेष प्रतिनिधी:- गडचांदूर शहर हे औद्योगिक शहर म्हणून ओडखळे जात असून कोरोना लॉक डाऊन काळ त माणिकगढ सिमेंट कंपनी पुन्हा सुरु करण्यावरून नगर परिषद आणि माणिकगढ प्रशासनात बराच वाद होऊन अखेर केंद्रीय सरकार च्या आदेशावरून कंपनी आणि सिमेंट वाहतूक सुरु झाली.
त्या वेळेस नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेचे गडचांदूरकर्रांनी भरभरून कौतुक केले .
दिल्ली वरून आलेल्या एका युवकापासून सुरु झालेल्या कोरोना रुग्ण बाधितांची संख्या बघता बघता दीड महिन्यात १९ पर्यंत पोहोचली असून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. सुरुवातीस अत्यंत कडक पद्धतीने सुरु असलेले मिशन कोरोना बघता बघता आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ज्यांचे सत्कार झाले (किंवा स्वतः घडवून आणले ?) ते लोक आता वादग्रस्त झाले आहे. एका मोठ्या राजकीय पक्षाने तर कोरोना बाबत होत असलेल्या निष्कडजी पण बाबत सर्व जवाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिले आहे.
आज पुन्हा ५ रुग्ण सापडताच प्रशाशन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडबड माजली आणि त्वरित नगर परिषद गडचांदूर येथे तातडीची सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. सदर बैठकीला सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते. सत्ताधारी पक्षाने बैठकीचे उद्देश सांगणे सुरु केल्या बरोबर भाजप नगरसेवक अरविंद डोहे यांनी ज्यांचे मुडे हि परिस्थिती उद्भवली त्यावर मुख्याधिकारी काय कारवाई करणार आहेत या बाबत प्रश्न उपस्तित केला. स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर आरोप होताच मुख्याधिकारी डॉ विशाखा शेडकी यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे कडक शब्दात प्रतिउत्तर दिले.
मुख्याधिकारी आणि नगरसेवक डोहे यांच्यातील जोरदार शाब्दिक चकमक बघून नवीनच निवडून आलेले नगरसेवक अवाक झाले. जुन्या पदाधिकाऱ्यांनी वाद शमनविण्याचा बराच प्रयत केला परंतु कारवाई बाबत ठाम असलेले नगर सेवक डोहे आणि काहीही झाले तरी कर्मचाऱ्यांची बाजू घेण्यात पटाईत मुख्याधिकारी कुणालाच जुमानत नव्हते. अखेरीस आपल्या सहकारी नगरसेवकाच्या अनुपस्थिती मुडे एकटे पडलेले डोहे यांना माघार घेत चर्चेतून बाहेर पडले . आज आपला झालेला अपमान हा माझा एकट्याचा नसून तुम्हा सर्व नवीन नगरसेवकांचा आहे असे बजावून नगर सेवक डोहे बाहेर निघून गेले.
पुढे महाविकास आघाडी चे घटक पक्षातील असलेले सत्ताधारी आणि विरोधक माणिकगड बाबत काय करायचे या चर्चेत गुंतले. उपस्थितांच्या सर्वानुमते जनता कर्फ्यू हा दि २७ ते २९ जुलै २०२० पर्यंत घेण्याचे ठरले. यात माणिकगड कंपनी सोडून इतर सर्वच व्यवहार बंद ठेऊन फक्त दवाखाने व मेडिकल सुरु राहतील याबाबत एकवाक्यता झाली.
एकेकाळचे माणिकगढ सिमेंट चे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी चे विधानसभा प्रमुख माजी सभापती अरुणभाऊ निमजे यांचे खंदे समर्थक शरदराव जोगी हे नगर परिषद मध्ये सध्या उपाध्यक्ष म्हणून विद्यमान आहेत.
सर्वपक्षीय सभेत माणिकगड बाबत निर्णय झालेला असतांना बैठक संपताच अध्यक्ष सौ. सविता सुरेश टेकाम , उपाध्यक्ष शरद जोगी आणि कंपनीचे जुने हितचिंतक काँग्रेस चे विद्यमान स्वीकृत सदस्य पापय्या पोन्नमवार यांनी सरळ कंपनीचा रस्ता धरला. कंपनीबाबत आधीच निर्णय झाला असतांना अध्यक्षांच्या नव्या कोऱ्या कारणे माणिकगड कंपनी मध्ये झालेला हा दौरा आता वादात सापडला आहे.
कर्फ्यू मधून कंपनी चे नाव काढणे हि आर्थिक व्यवहारातून झालेली आहे अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कंपनी मध्ये झालेल्या चर्चेबाबत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक अनभिज्ञ असून सर्व व्यवहार तिघांनीच केल्यामुडे इतर नगरसेवकांमध्ये आता कुरबुर सुरु झाली आहे. अरुण निमजे यांची माणिकगड विरोधी आक्रमक भूमिका आणि त्यांचेच उपाध्यक्ष शरद जोगी यांचे माणिकगड प्रेम सध्या गडचांदूरकरांसाठी खमंग चर्चेचा विषय बनलेला आहे….

Previous articleकोरोना अपडेट :- आज जिल्ह्यात पुन्हा 18 कोरोना बाधित आले समोर, एकूण संख्या पोहचली 294 वर.
Next article27 जुलै च्या गडचांदूर जनता कर्फ्यू बाबत संभ्रम कायम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here