Home वरोरा आनंदाचा क्षण :- वेतन वाढ करून दिल्याबद्दल सफाई कामगारांनी छोटुभाईचा केला सत्कार.

आनंदाचा क्षण :- वेतन वाढ करून दिल्याबद्दल सफाई कामगारांनी छोटुभाईचा केला सत्कार.

 

आपल्या प्रत्येक संकटात व समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तयार , छोटूभाई यांचे सफाई कामगारांना आश्वासन. 

वरोरा प्रतिनिधी :- 

चंद्रपूर गडचिरोली असंघटित कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा वरोरा नगरपरिषदचे बांधकाम सभापती यांच्या सततच्या पाठपुराव्याने आणि आंदोलनात्मक भूमिकेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तालुकास्तरीय असलेले सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात मागील अनेक वर्षापासून सेवा देण्याचे काम करणाऱ्या सफाई कामगारांचे वेतन वाढवून दिल्याने सफाई कामगारांनी छोटूभाई शेख यांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार केला,
आरोग्य विभागात चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात सर्व सफाई कामगारांना यापूर्वी 2015 मध्ये तीन ते चार हजार रुपये वेतन मिळत होते परंतु छोटूभाई यांनी आंदोलन व पाठपुरावा करून 2016 पासून आठ हजार चारशे रुपये वेतन मिळवून दिले आणि आता सन 2019 20 मध्ये जिल्ह्यातील सर्व सफाई कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे 14000 च्या वर वेतन मिळून दिले त्यमुळे सफाई कामगारांना मोठा आनंद झाल्याने त्यानी दिनांक 22 ऑगस्टला छोटूभाई यांचा वरोरा उपजिल्हा रुग्णालय व इतर काही रुग्णालयातील सफाई कामगारांनी मिठाई पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले यावेळी छोटूभाई यांनी आपल्या संकटात व समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर असेल असे आश्वासन देऊन कामगारांच्या आनंदात आपल्याला सुद्धा मोठा आनंद झाला असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित सर्वांसमोर व्यक्त केल्या, याप्रसंगी सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleसनसनिखेज:- गांजा किंग मंगेश वरवडेचा गांजा जोरात ? भंगाराम वार्डमधे खुलेआम गांजाची विक्री.
Next articleहिरापूर येथे जनावरांचे लसीकरण शिबीर संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here