Home भद्रावती सनसनिखेज:- गांजा किंग मंगेश वरवडेचा गांजा जोरात ? भंगाराम वार्डमधे खुलेआम गांजाची...

सनसनिखेज:- गांजा किंग मंगेश वरवडेचा गांजा जोरात ? भंगाराम वार्डमधे खुलेआम गांजाची विक्री.

 

अल्पवयीन मुलेही लागले गांजा फूकायला येणारी पिढी बरबाद होण्याची चिन्हे कारवाईची मागणी.

भद्रावती प्रतिनिधी  :-

भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शहरातील भंगाराम वार्डात गांजा किंग मंगेश वरवडेचा गांजा जोरात सुरू असून पोलिसांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे, भंगाराम वार्डात अल्पवयीन शाळेकरी मुले पण गांजा फूकायला लागले असल्याने ह्या वयात गांजा शौकीन मुले भविष्यात कसे सुधारणार त्यामुळे त्यांचे आई वडील चिंतेत असल्याचे बोलल्या जात आहे.

गांजा किंग मंगेश वरवडे हा येणारी भावी पिढी बरबाद करायला निघाला आहे अशी प्रतिक्रीया आता शहरात असल्याने या गंभीर प्रकारावर वेळीच आळा बसवला गेला नाही तर तरुण पिढी बरबाद होण्याची चिन्हे दिसत आहे. अर्थात पोलिसांनी या अवैध गांजा विक्रीवर त्वरित पायबंद घालून गांजा किंग मंगेश वरवडे यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी भंगाराम वार्डातील नागरिकांकडून होत आहे.

Previous articleधक्कादायक :- विभागीय वन अधिकारी सोनटक्के यांनी रस्ताच हडपला असल्याचे विंग फुटले अन रस्त्याचे बांधकाम सुरू केले ?
Next articleआनंदाचा क्षण :- वेतन वाढ करून दिल्याबद्दल सफाई कामगारांनी छोटुभाईचा केला सत्कार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here