चंद्रपूर जिल्ह्यात मनसेच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात मनसेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची उपास्थिती.
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यात मनसेला ताकत देण्याचं काम आता मनसे अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी देतं असून कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांच्या नेतृत्वात जिल्हा संपर्क अभियान सुरु आहें, दरम्यान येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीकरिता गावाखेड्यावर मनसेचे जनसंपर्क अभियान सुरु असून बल्लारापूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या विसापूर या गावात मनसेच्या शाखा उदघाटनाच्या कार्यक्रमासह इतर राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यक्रऱ्याचा मनसेत प्रवेशाचा कार्यक्रम मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विसापूर येथील मनसेचे जुने पदाधिकारी व आता मनसे जनहीत कक्ष बल्लारापूर तालुका सचिव राजू लांडगे यांच्या नेतृत्वात दिनांक 28 जून ला आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात बल्लारापूर तालुक्यातील अनेक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मनसेचा दुपट्टा घालून पक्ष प्रवेश केला आणि यापुढे मनसेची ताकत वाढविण्याचा संकल्प केला.
विसापूर येथे शाखा फलकाचे उदघाटन करण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी मंच्यावर मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, रोजगार स्वयंरोजगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, जनहीत कक्षाचे चंद्रपूर शहर अध्यक्ष पियुष धुपे, मनसे महिला सेनेच्या चंद्रपूर शहर अध्यक्षा वर्षा भोंबले, अनुप यादव इत्यादीची उपास्थिती होती.
कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपास्थित होते, या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पक्ष प्रवेश विसापूर राजू भाऊ लांडगे, बळी भाऊ नरूले शाखा अध्यक्ष, किशोर नागापुरे, नारायण शिकारदार, दिलीप नान्ने, राकेश जवादे. रमेश शिवरकर, निलेश राऊत, नानाजी शिकारदार, जीवन मेश्राम, ग॔गाधर नान्ने, शिवा वाडिले, फरजना शेख, संगिता लांडगे, अमन थूल, प्रतीक चिकाटे, शरद गणवीर, राज आत्राम, परितोष मंडळ, कैलाश पाटील, आसिफ शेख इत्यादी मानसैनिकांनीप्रयत्न केले.