Home चंद्रपूर दखलपात्र:- आरएफओ स्वाती मैस्कर यांची रेती माफियांच्या रेती स्टॉक वर बेधडक करावाई.

दखलपात्र:- आरएफओ स्वाती मैस्कर यांची रेती माफियांच्या रेती स्टॉक वर बेधडक करावाई.

चंद्रपूर उपविभागात असलेल्या अंधारी नदी च्या अजयपूर गोंडसावरी रेती घाटातून आलेल्या रेतीचा स्टॉक पकडला…पूर्व आरएफओ खाडे दोषी.

चंद्रपूर :-

चंद्रपूर वनपरीक्षेत्रातील अजयपूर परिसरात वन विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध साठा आढळल्याने त्या क्षेत्रात नुकत्याच बदली होऊन आलेल्या वनपरीक्षेत्र अधिकारी स्वाती मैस्कर यांनी त्या रेती साठ्यावर बेधडक कारवाई करून रेती साठा जप्त केला आहें, या कारवाई ची माहिती मिळताच मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी भेट देऊन व ज्या अंधारी नदीच्या अजयपूर गोंडसावरी रेती घाटातून आलेल्या त्या रेती घाटाची पाहणी करून मोका चौकशी केली असता मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करण्यात आल्याचे निदर्शनास आले, दरम्यान नियमानुसार या रेती घाटातून 0.5 मिटर रेतीचा उपसा करायचा आहें व वनविभाग यापासून किमान 6 मीटर अंतर राखून असायला हवे पण त्याचे सुद्धा उल्लंघन केले असल्याने पर्यावरणाचे नुकसान व अवैध उत्खनन केल्याप्रकारणी या रेती घाट धारकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांच्याकडून होत आहें.

रेती लिलावाकरिता शासनाचे मे 2019 चे धोरण पूर्णतः फेल झाल्यानंतर शासनाने सन 2025 ला नवीन धोरण आणले कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहीत याचिका आणि त्यांचे निकाल यासंदर्भात सरकारी यंत्रणा यांना स्पष्ट निर्देश नव्हते, दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी नुकतेच नवीन रेती धोरण आणून नदी रेती घाटाचे लिलाव करण्याचे निर्देश दिले जे “देर आये दुरुस्त आये.” या उक्तीप्रमाणे रेतीच्या अवैध चोरी संदर्भात आहें, मात्र आता त्या सर्व रेती धोरणाचा बट्याबोळ करत ज्या रेती घाट धारकांनी शासनाच्या नियम व अटी शर्ती नुसार रेतीचा उपसा करेन या तत्वावर रेती घाट लिलावात घेतले त्यांनीच रेती शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडविण्याचे नवे धोरण अवलंबिले असल्याने यावर वचक कोण करणार? असा प्रश्न निर्माण होत असून वनविभागाच्या जागेवर कुठलीही परवानगी नसताना जर रेतीचा साठा होत आहें तर त्यावर वन विभागाची कारवाई होऊन त्या जागेवर रेती साठा करणाऱ्या रेती घारकवर गुन्हे दाखल करून त्यांच्याचार दंडात्मक कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा महेश वासलवारयांनी दिला आहें.

तें कोण आहें रेती साठा करणारे? आरएफओ प्रशांत खाडे दोषी.

महसूल प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला घूस देऊन आपला कोट्यावधीच्या रेती व्यवसायाला चालना देणाऱ्या त्या रेती माफियांनी आपली दादागिरी वाढवली असून वनविभागाच्या जागेवर सुद्धा अतिक्रमण करून तिथे हजारो ब्रास रेतीचा साठा केला असून तो रेती साठा नेमका केला कुणी हा महत्वाचा प्रश्न असून मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्याच्या गाडी मागे तें अवैध रेती माफिया पाठलाग करत होते त्यामध्ये एक ठाकूर आडनावाचे रेती माफिया होते अशी माहिती आहें, दरम्यान आरएफओ मैस्कर यांच्या अगोदर जे प्रशांत खाडे आरएफओ हे वनपरीक्षेत्रात होते त्यांनी या ठिकाणी रेती साठा करण्याची परवानगी दिली असावी अशी शक्यता असून त्या दोषी आरएफओ वर पण कारवाई व्हायला हवी अशी मागणी मनसे कडून होत आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here