Home चंद्रपूर लक्षवेध:- पोंभुर्णा तालुक्यातील जूनगाव रेती घाटातून उपसलेल्या हजारो ब्रॉस रेतीचे ढीगारे कुणाचे?

लक्षवेध:- पोंभुर्णा तालुक्यातील जूनगाव रेती घाटातून उपसलेल्या हजारो ब्रॉस रेतीचे ढीगारे कुणाचे?

मंजुरीपेक्षा दहापटीने रेती साठा उपसा करणाऱ्या त्या रेती घाट धारकावर कारवाई होईल का? मनसे वाहतूक सेना आंदोलनाच्या पवित्र्यात?

पोंभुर्णा प्रतिनिधी :-

रेती उपसा करण्याची मुद्दत संपल्याच्या दिवसात कोट्यावधीचा खर्च करून रेती घाट लिलावात घेणारे लिलावधारक यांना रेती उपसा करण्याचा पुरेसा वेळ मिळाला नाही ही बाब खरी आहें, पण ज्याअर्थी 10 जून पासून नदी पात्रातून रेतीचा उपसा करण्याची मुद्दत संपली असताना पोंभुर्णा तालुक्याच्या जूनगाव रेती घाटातून केवळ 4417 ब्रॉस ची मंजुरी असतांना त्या रेती घाटातून 40 हजार पेक्षा जास्त रेतीचा उपासा करून तीन मोठे रेती साठ्याचे पहाड उभे केल्याची बाब आता उघड झाली असून मंजुरी पेक्षा जास्त रेतीचा उपसा करणाऱ्या त्या रेती घाट धारकावर जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी व स्थानिक तहसीलदार कारवाई करणार का? की शासनाचा कोट्यावधी चा महसूल बुडवून रेती माफियाचे संरक्षण करणार? हा प्रश्न विचारल्या जात आहें.

पोंभुर्णा तालुक्यात चार रेती घाट लिलाव होऊन त्यातून रेतीचा उपसा मुद्दत संपल्यानंतर सुद्धा अविरत सुरु आहें आणि त्याला स्थानिक तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि पोलीस प्रशासनाचा पाठिंबा आहें, जूनगाव व्यतिरिक्त आष्टा, वेळवा चेक व थेरगावरै ह्या रेती घाटातून उपसा आताही होतं आहें, खरं तर अतिरिक्त रेती उपसा होतं असला तरी त्याला त्यातून मर्यादित रेती साठा आहें असे दिसत आहें, मात्र जूनगाव रेती घाट जो वैनगंगा नदीवर असून तो गडचिरोली सीमेवर आहें आणि तो आतामध्ये असल्याने त्याकडे फारसे कुणी लक्ष घालत नाही, पण राहुल पाल नामक व्यक्ती तो रेती घाट कंट्रोल करत असून जवळपास 10 पट रेती साठा तीन रेती ढिगाऱ्यातून स्पष्ट दिसत आहें त्यामुळे याची किंमत मोजली तर ती कोटीवाधीच्या घरात जात असल्याचे दिसत आहें आणि त्यामुळे शासनाचा महसूल बुडवीला जात आहें, यावर महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासन डोळे मिटून बसले की डोळे बंद करायला भाग पाडले हा संशोधनाचा विषय असून या संदर्भात मनसे वाहतूक सेनेच्या माध्यमातून एल्गार पुकारून महसूल प्रशासनाला जबाब विचारेल आणि आंदोलन पुकारेल असे संकेत मिळतं आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here