Home गडचिरोली धक्कादायक :- विभागीय वन अधिकारी सोनटक्के यांनी रस्ताच हडपला असल्याचे विंग फुटले...

धक्कादायक :- विभागीय वन अधिकारी सोनटक्के यांनी रस्ताच हडपला असल्याचे विंग फुटले अन रस्त्याचे बांधकाम सुरू केले ?

 

विभागीय चौकशीत कारणे दाखवा नोटीस चे उत्तर न देता सोनटक्के यांनी रस्ता अस्तित्वात असल्याचा केला बनाव ?

acf च्या  मौका चौकशीत dcf ने केले काम बंदचे आदेश सोनटक्के यांचे धाबे दणाणले .

कुरखेडा प्रतिनिधी :-

कुरखेडा येथील सोनटक्के ह्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल सध्या वन विभागात चर्चेचा मोठा विषय असून भ्रष्टाचाराच्या गर्तेत सोनटक्के पूर्णतः दोषी शीद्ध होण्याच्या आणि निलंबीत होण्याच्या मार्गावर असताना त्यांची वनमंत्री यांच्याकडे धाव आणि भ्रष्टाचार केला पण तो लपवीण्याचा प्रयत्न यामुळे ते शेवटच्या क्षणी सुद्धा स्वतःला निलंबन होण्याचा बचाव करीत आहे असे दिसते.

कुरखेडा वनपरिक्षेत्राच्या वनअधिकाऱ्यांनी कुरखेडा, पलसगड व गोठणगांव उपक्षेत्रामध्ये रस्त्याचे बांधकाम दाखवून पुर्ण निधीचं हडप केल्याचा प्रकार कुरखेडा वनपरिक्षेत्राचे प्रभारी उपविभागीय अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी केला पण त्यांचे बिंग फुटले आणि विभागीय चौकशीला त्यांना सामोरे जावे लागले यामधे विभागीय चौकशीत त्यानी भ्रष्टाचार केल्याचे शीद्ध होऊन त्यांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा देण्यात आला मात्र सोनटक्के यांनी वनमंत्री यांच्याकडे धाव घेऊन चौकशी अधिकारी यांच्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला दरम्यान आता रस्त्यांचे बांधकाम झालेच नसतांना सोनटक्के यांनी गोठणगाव उप वनपरिक्षेत्रात रस्त्यांचे बांधकाम झाले हे दाखवण्यासाठी चक्क ते काम एका ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू केले, हे काम सुरू असताना एका सामजिक कार्यकर्त्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी खुद्द acf यांना फोन करून हा काय प्रकार आहे अशी विचारणा केली असता सोनटक्के यांनी गायब केलेल्या रस्ते बांधकामाचे रहस्य उघड झाले.

सरळ अनुदान रक्कमेअंतर्गत कुरखेडा उपक्षेत्र-०२ नियतक्षेत्र जांभूळखेडा रस्ते बांधकाम, पलसगड उपक्षेत्र-०१ नियतक्षेत्र पिट्टेनकर रस्ते बांधकाम यासह गोठणगांव उपक्षेत्र-०४ रस्ते बांधकाम करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. व निधी परस्पर हडपण्यात आल्याचा प्रकार पूरव्यासह उघडकीस आला आणि विभागीय चौकशीत ते शीद्ध पण झाले मात्र तो मी नव्हेच या आविर्भावात वनमंत्री यांच्याकडे साकडे घालून स्वतःला वाचवीण्याचा प्रयत्न चालविला होता तो भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल ने हाणून पाडला त्यामुळे चक्क संपादक यांनाच बदनाम करण्यासाठी सोनटक्के यांनी बोगस पत्रकारांची टीम बनवून भुंकायचा प्रयत्न केला खरा पण निष्फळ ठरला आणि आता सोनटक्के पुन्हा एकदा आपले पाप लपवीण्याच्या नादात रंगेहाथ सापडला त्यामुळे खरं ते खरं असत आणि ते अखेर शीद्ध झाल आहे. त्यामुळे सोनटक्के यांच्यावर निलंबनाची कारवाई ही ठरलेली असल्याचे चित्र दिसत आहे …

Previous articleआक्षेपार्ह :- वणी तालुक्यात दारूचा व्यवसाय करणारे घूघूस रहिवाशी चंद्रपूर जिल्ह्यात करतात दारू पुरवठा?
Next articleसनसनिखेज:- गांजा किंग मंगेश वरवडेचा गांजा जोरात ? भंगाराम वार्डमधे खुलेआम गांजाची विक्री.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here