Home चंद्रपूर आक्षेपार्ह :- वणी तालुक्यात दारूचा व्यवसाय करणारे घूघूस रहिवाशी चंद्रपूर जिल्ह्यात करतात...

आक्षेपार्ह :- वणी तालुक्यात दारूचा व्यवसाय करणारे घूघूस रहिवाशी चंद्रपूर जिल्ह्यात करतात दारू पुरवठा?

 

छोट्या दारू विक्रेत्यांना होतात अटक मग ज्यांच्या बार आणि वाईन शॉपी, देशी दारू दुकानातून दारू येते त्यांच्यावर कारवाई कोण करणार ?

घूग्गूस प्रतिनिधी :-

घूग्गूस हे शहर दारू तस्करीचा अड्डा बनला असून शहरात वणी तालुक्यात देशी विदेशी दारू विक्रीचे अधिक्रुत परवानेधारक राहत असून घूग्गूस हाच खऱ्या अर्थाने चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू पुरवठा करणारा मुख्य स्त्रोत असल्याचे आता जहीर झाले आहे,

तीन दिवसापूर्वी रात्री पडोली पोलिसांनी चंद्रपूर मार्गावरील चिंचाळा गावाजवळ केलेल्या कारवाईत कमल स्पोर्टिंग क्लबच्या अध्यक्षासह एकास दारू तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली. ही दारू भालर येथील दारू दुकानातून आल्याचे बोलल्या जात आहे तर दोन महिन्यापूर्वी कैलास नगर येथील नागराज यांच्या गीतांजली बार मधून दारू पुरवठा होत असताना गडचांदूर पोलिस हद्दीत ती दारू पकडली पण गडचांदूर पोलीसानी त्या प्रकरणात नागराज यांच्या कडून पैसे घेवून ते प्रकरण थोडक्यात संपवले पण दारूबंदी जिल्ह्यात जर अवैध दारू येत असेल तर ती दारू ज्या जिल्ह्यातील बार आणि वाईन शॉपी मधून येते त्या दुकानाचे परवाने रद्द करण्याचे प्रावधान आहे तर मग आजपर्यंत कोट्यावधी रुपयाची देशी विदेशी दारू चंद्रपूर जिल्ह्यात आली त्या प्रकरणात किती बार व वाईन शॉप च्या मालकांवर कारवाई झाली ? हा अतिशय चिंतनिय प्रश्न असून पोलिस प्रशासन हेच खरे अवैध दारू तस्करी करणाऱ्यांचे पाठीराखे असल्याचे चित्र दिसत आहे.
घूग्गूस येथे राहणारे व मुंगोली कैलास नगर आणि भालर येथे अधिक्रुत दारू विक्री परवान्याच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू पुरवठा करणारे राजू कलवल,, नागराज आणि राजू पल्ले उर्फ राजू अण्णा हे चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू पुरवठा करीत असल्याची चर्चा आहे तर वणी येथील जन्नत हॉटेल समोरील एका देशी दारू दुकानातून घूग्गूस मार्गाने दारू तस्करी होत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. हा अवैध दारू पुरवठा शिरपूर पोलिस स्टेशन ची ठाणेदार राऊत यांच्या आशीर्वादाने खुलेआम होत असल्याची सुद्धा चर्चा आहे. आता दारूबंदी च्या नावाखाली अधिकृत परवाने धारक यांना घरी बसवून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू तस्करा कडून पुरवठा होत असेल तर नुकसान तर शासनाचे च आहे मग दारूबंदी उठवून हजारो लोकाना अधिकृत रोजगार देणे काय वाईट आहे ? याचा विचार शासनाने करून अवैध दारू पुरवठा करणाऱ्या परवाने धारक दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here