Home चंद्रपूर धक्कादायक :- भारतीय पुरातत्व विभागाच्या आदेशाला चंद्रपूर मनपाचा खो प्रदीप नालमवार यांच्या...

धक्कादायक :- भारतीय पुरातत्व विभागाच्या आदेशाला चंद्रपूर मनपाचा खो प्रदीप नालमवार यांच्या अवैध बांधकामाचे सरक्षण ?

राजेश बेलेचे बांधकाम तोडायला घाई मग प्रदीप नालमवार व नरेंद्र गेडाम यांचा बचाव का ?

चंद्रपूर मनपाचा भ्रष्ट कारभार भाग -2

चंद्रपूर मनपा प्रशासन म्हणजे जणू काही सत्ताधारी यांनी आपली खाजगी मालमत्ता समजली का ? असा प्रश्न उभा राहतो, कारण मी म्हणेल तो कायदा असाच प्रकार चंद्रपूर मनपा मधे अधिकारी आणि सत्ताधारी यांच्या माध्यमातून चालविला जात आहे. शहरातील सामजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी मनपा च्या कोविड सेंटर मधील भ्रष्टाचार उघड केला म्हणून त्यांचे बांधकाम त्यांना आपली बाजू मांडू न देता मनपा तोडते तर दुसरीकडे तहसीलदार यांच्याकडून नरेंद्र गेडाम यांचे दोन मजली इमारत बांधकाम तोडण्याचे आदेश असताना मनपा ते बांधकाम तर तोडत नाहीच उलट त्यांच नरेंद्र गेडाम यांच्या तक्रारी वरून ज्यांची 40 वर्षांपेक्षा जास्त काळ मालकी आहे त्या जागेवरील साध्या विटाचे कंपाउंड़ तात्काळ तोडल्या जाते. म्हणजे चंद्रपूर मनपा प्रशासन कायदा हातात घेणाऱ्याच्या हातात हात घालून त्यांचे सरक्षण करतात हे स्पष्ट दिसत आहे.
हे सगळं चित्र दिसत असताना आता तर त्याहून कहर म्हणजे चक्क भारतीय पुरातत्व विभागाने जेटपुरा गेट डॉ गुलवाडे यांच्या रूग्णालयासमोर असलेल्या प्रदीप नालमवार यांच्या अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश दिले असताना चंद्रपूर मनपा ने तो आदेश न मानता त्या बांधकामाला अगोदरच मंजुरी दिली असल्याने केवळ मंजुरी च्या अतिरिक्त बांधकाम तेवढे तोडले, पण आश्चर्याची बाब म्हणजे किल्ला सरक्षण भिंतीला लागून कुठल्याही बांधकामाला मनपा परवानगी कशी काय देवू शकते ? यामागे काय रहस्य आहे ? हे कळायला मार्ग नाही कारण स्वतः मनपा प्रशासन कायदा हातात घेत असल्याचे चित्र आहे. शहरातील जनतेच्या करावर मनपा चा आर्थिक कारभार चालतो मात्र त्याच जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करून मनपा प्रशासन जनतेवर अन्याय करीत असेल तर अशा मनपा प्रशासनाचा विरोध व्हायलाच हवा आणि त्यामुळेच मनपा च्या या भ्रष्ट वोंगळ कारभाराची पोलखोल भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल वर प्रकाशित होत असून जनतेने आपली प्रतिक्रिया आणि अशाच प्रकारे अन्याय झाला असल्यास संपादक यांना माहिती द्यावी असे आव्हान करण्यात येत आहे, चंद्रपूर मनपा चे थक्क करून सोडणारे अनेक कारनामे आता दररोज वाचकांना वाचायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here