Home चंद्रपूर खळबळजनक :- माजी केंद्रीय राज्यमंत्री यांच्या कमल स्पोर्टिंग क्लबच्या अध्यक्षांसह इतर दारू...

खळबळजनक :- माजी केंद्रीय राज्यमंत्री यांच्या कमल स्पोर्टिंग क्लबच्या अध्यक्षांसह इतर दारू तस्कर पोलिसांच्या जाळ्यात.

 

घूग्गूस बनला दारू तस्करीचा अड्डा, अनेक दारू तस्कर घूग्गूसचे रहिवाशी ? पडोली पोलिसांनी पकडलेली दारू भालर मधून आल्याचे संकेत, ज्या बार आणि देशी दारू दुकानातून दारू पुरवठा होते त्या बार मालक आणि दुकानदारावर कारवाई का नाही ?

घूग्गूस पोलिसांच्या देखरेखीखाली दारू तस्करांना अभयदान ?

घूग्गूस प्रतिनिधी:-

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असली तरी ती फक्त काही लोकांसाठी आहे बाकीचे तर पोलिसांच्या क्रुपेने जणू अधिक्रुतपणे दारू पुरवठा करतात व ग्राहकांना पाहिजे त्या ठिकाणी दारू पोहचवुन ऑनलाईन धंदा करीत आहे. यामधे आता काही राजकीय पुढारी यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची दमदार एंट्री पोलिसांच्या खास देखरेखीखाली फळाला येत आहे. मात्र काही पोलिसांची अवक्रुपा होते आणि  काही मोजक्या अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करून पोलीस जणू नंतर च्या खेपेत आपली हप्ता एन्ट्री करीत असतात. अशी चर्चा नेहमीच रंगत असते. काही महिन्यापूर्वी घूग्गूस पोलीसानी राजू अण्णा नामक मोठ्या दारू माफियाला 30 पेट्या दारू सह अटक केली होती, तो राहतो घूग्गूस मधे पण धंदा यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील भालर येथे करतो राजू अण्णा उर्फ राजू पल्ले, भालर राजू कलवल मुंगोली यांची देशी दारू दुकाने असून हे दोन्ही घूग्गूस मधे राहतात व धंदा यवतमाळ जिल्ह्यात करतात आणि चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हे देशी दारू पुरवठा करतात,  महत्वाची बाब म्हणजे काही दारू तस्करी करणाऱ्यांना  पोलिस दारूसह  पकडतात पण ज्या दुकानदाराकडून दारू आणली जाते त्या दुकानदाराला का सोडल्या जाते ? याचे उत्तर पोलिस प्रशासनाकडे पण नसावे मात्र घूग्गूस आता दारू माफियांचा अड्डा बनला असून येथील मोठे दारू तस्कर जर पकडले तर पोलिस निश्चितच अवैध दारू पुरवठा करणाऱ्यांवर व विक्रेत्यांवर नियंत्रण आणू शकते. मात्र घूग्गूस पोलिसांचे दारू तस्कर यांना जणू अभयदान असल्याची स्थिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी  रात्री पडोली पोलिसांनी चंद्रपूर मार्गावरील चिंचाळा गावाजवळ केलेल्या कारवाईत जिल्ह्यातील मोठे नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री यांच्याशी संलग्न कमल स्पोर्टिंग क्लबच्या अध्यक्षासह एकास दारू तस्करीप्रकरणी अटक केली. यावरून आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्राच्या नावाखाली दारू तस्करी केली जात असल्याचे उघड होत आहे.

चंद्रपूर रोडवरील चिंचळा चौकात शनिवारी रात्री पडोली पोलिसांनी एमएच – 34 बीबी 1474 कार चंद्रपूरकडे जात असताना देशी दारूचे 10 बॉक्स जप्त केले अशी माहिती आहे पण प्रत्यक्षात जवळपास 25 ते 30 खोके बॉक्स असल्याची विश्वसनीय माहिती आहे असे असताना
घुग्घुस येथील रहिवासी, पवन पुरैल्ली हे कमल स्पोर्टिंग क्लब चंद्रपूर, घुग्घुस शाखेचे अध्यक्ष आहेत. ही संस्था माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्याशी निगडित आहे. त्याच्यासह विशाल धमेरा (शिवनगर) यास पडोली पोलिसांनी ताब्यात घेतले.काल  त्याला न्यायालयात हजर केले असता एका दिवसाच्या पी सी आर मिळाला असल्याची माहिती आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतानाही यवतमाळ जिल्ह्यातून छुप्या मार्गाने अवैद्य दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर अंकुश लावण्यासाठी सिमा परिसरात नाकाबंदी करून ज्या व्यक्ती आणि दारू दुकानातून ही दारू पुरवठा येते त्या दुकानावर च कारवाई करणे अभिप्रेत आहे परंतु पोलिसांच्या हप्ता वसुलीमुळे अवैध दारू पुरवठा करणाऱ्यांना पाठीशी घातल्या जाते आणि अवैध दारू पुरवठा नियमितपणे सुरू असतो.

चंद्रपूर शहरात आणि तालुक्यात घूग्गूस शहरातील मोठ्या दारू माफिया कडून अवैध दारूचा साठा पुरवठा केल्या जातो आणि त्यासाठी सीमा मार्गावर पोलिस तपासणी केली जाते. या नंतर ही चंद्रपूर जिल्ह्यात दारूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. अशातच पोलिस कारवाईत पोलीस कर्मचारी राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी अवैध दारू पुरवठा करताना सापडू लागल्याने अवैध दारू विक्रीचे तार सर्वत्र जुळले असल्याचे चित्र आहे.

Previous articleखळबळजनक :- माजी केंद्रीय राज्यमंत्री यांच्या कमल स्पोर्टिंग क्लबच्या अध्यक्षांसह इतर दारू तस्कर पोलिसांच्या जाळ्यात.
Next articleधक्कादायक :- भारतीय पुरातत्व विभागाच्या आदेशाला चंद्रपूर मनपाचा खो प्रदीप नालमवार यांच्या अवैध बांधकामाचे सरक्षण ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here