Home कोरपणा हिरापूर येथे जनावरांचे लसीकरण शिबीर संपन्न

हिरापूर येथे जनावरांचे लसीकरण शिबीर संपन्न

 

प्रमोद गिरडकर कोरपना प्रतिनिधी

सरपंच प्रमोद कोडापे यांचा पुढाकार

मंगळवार दिनांक 25 आगस्ट जिल्यातील ग्रामीण भागात जनावरांवर ओढवलेल्या लम्पी स्कीन डिसीज रोगाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात सर्वत्र लसीकरण शिबिराचे आयोजन केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 25.8.2020मंगळवार ला सकाळी 7.30 वाजता हिरापूर .ता.कोरपना येथे लम्पी स्किन डिसीज या जनावरांवरील आजाराला आळा बसावा व हा रोग इतर जनावरांवर पसरू नये यासाठी हिरापूर ग्राम पंचायतीचे सरपंच प्रमोद कोडापे यांनी जवळच्या आवाळपूर येथिल पशुवैयद्यंकीय डॉकटर श्री. शेंडे यांच्याशी फोनद्वारे व प्रत्यक्ष भेट घेऊन हिरापूर येथे जनावरांना लसीकरण लावण्याचे शिबीर घेण्यासंदर्भात चर्चा केली .व आवाळपूर येथील पशुधन पर्यवेक्षक श्री.शेंडे यांनी सरपंच प्रमोद कोडापे यांच्या चर्चेला प्रतिसाद देत हिरापूर येथे पशु लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या लसीकरण शिबिरात 185 बैल व 35 इतर लहान गुरे यावर लसीकरण करण्यात आले. व यावेळी आम्ही पशुधनाच्या संवर्धनाशी जास्त खबरदारी घेऊ असे,व वेळोवेळी लसीकर करू व पशुपालकांनी करत रहावे असे डॉ.शेंडे यांनी सांगितले. यावेळी सरपंच प्रमोद कोडापे,उपसरपंच शिवाजी बोढे,ग्राम पंचायत सदस्य रवींद्र आत्राम, पशुधन पर्यवेक्षक डॉ .श्री.शेंडे,डॉ.श्री.ठाकरे,श्री.डाखरे,व इतर ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here