Home वरोरा अविस्मरणीय :- प्रशिद्ध गवते महाराज यांनी कापसाची गणेश मूर्ती बनवून शेतकऱ्यांना दिला...

अविस्मरणीय :- प्रशिद्ध गवते महाराज यांनी कापसाची गणेश मूर्ती बनवून शेतकऱ्यांना दिला अनोखा संदेश!

 

सतत सहा वर्ष कापसाची गणेश मूर्ती बनविण्याचे सहावे वर्ष, शेतकऱ्यांच्या श्रमाची पूजा घडविण्याचा प्रयत्न.

विशेष वार्ता  :-

शेतकऱ्यांच्या जीवनात काबाडकष्ट लिहिले असले तरी त्यांच्या श्रमातून जगातील लोकांची भूक भागवल्या जाते मात्र त्यांच्या श्रमाचे प्रदर्शन कधी होत नाही नव्हे त्यांच्या श्रमाला जणू किंमतच नाही असेच जणू चित्र रंगवले जाते पण प्रशिद्ध गवते महाराज यांनी शेतकऱ्यांच्या श्रमाला लोकांसमोर आणण्यासाठी चक्क कापसाचा गणपती बनवून त्या गणेशाची वरोरा तालुक्यातील बोरगाव कवडसी येथील कोंगरे यांच्या घरी स्थापना केली, महत्वाची गोष्ट म्हणजे मातीच्या गणपतीचे आपण विसर्जन करतो पण गवते महाराज यांच्या संकल्पनेत कापसाच्या गणपती चे विसर्जन करायचे नव्हे तर त्या गणपतीचे दहा दिवसानंतर पुन्हा कापसात रूपांतर करून त्या कापसाच्या पुड्या बांधून गावातील शेतकऱ्यांना वाटप होईल आणि जशा मातीच्या मूर्ती चढ्या पैशाने विकत घेतल्या जाते मग कापसाच्या मूर्तीचे मूल्य पण सरकारनी समजून घेवून शेतकऱ्यांच्या शेत पिकाला चांगला भाव द्यावा व शेतकऱ्यांच्या श्रमाची किंमत द्यावी असा संदेश या कापसाच्या गणेश मूर्तीतून गवते महाराज देत आहे जी गोष्ट महाराष्ट्रच्या इतिहासात अविस्मरणीय अशीच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here