Home गडचिरोली खळबळजनक :- वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांचा प्रताप? बांबू तोडले वनातले, दाखविले खाजगी...

खळबळजनक :- वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के यांचा प्रताप? बांबू तोडले वनातले, दाखविले खाजगी शेतातले.

भुमिपुत्राची हाक” पोर्टल ने भ्रष्टाचारी सोनटक्के यांचे अनेक कारनामे उघडकीस आणल्याने सोनटक्के यांच्यावर निलंबनाची कारवाई निश्चित .

कुरखेडा प्रतिनिधी :-

कुरखेडा वन परिक्षेत्राचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांचे अनेक कारणामे आत्तापर्यंत विविध माध्यमातून प्रकाशित झाले आहेत, तक्रारी झाल्यात, चौकश्या बसल्या. साप्ता. “भुमिपुत्राची हाक” पोर्टल ने ही भ्रष्टाचारी सोनटक्के यांचे अनेक कारनामे उघडकीस आणले. त्यानंतरही “सब जैसे थे” (पैसा बोलता है) असेच सोनटक्के याचे प्रकरण आहे. संपूर्ण गडचिरोली चे जंगल विकण्याची “लायकी” असलेले व वन विभागासाठी कलंक असलेले सोनटक्के यांची प्रामाणिकपणे चौकशी झाल्यास महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा वन घोटाळा हा सोनटक्के यांचा उघडकीस येऊ शकतो.
नुकतेच हाती आलेल्या प्रकरणांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा वनपरिक्षेत्र अंतर्गत गुडगाव परिक्षेत्र मध्ये मसली नाक्यावरून बांबूचे ट्रक निघाले, त्याची नोंद वन विभागाच्या मसली नाक्यावर झालेली आहे. लांब पल्ल्याचे बांबू असलेले जवळपास तीस ट्रक या नाक्यावरून नोंद करून सोडण्यात आले. यातील तीन ट्रक ची चौकशी झाली असता ते मडावी यांच्या खाजगी शेतातून बांबू तोडल्याचे दाखविण्यात आले. या संबंधात विभागीय चौकशी झाली चौकशीमध्ये हे बांबू खाजगी सेक्टर मधून आणल्याचे दाखविण्यात आले, परंतु कुरखेडा वनविभागाच्या कंपार्टमेंट नंबर 1052 या वनपरिक्षेत्रातून 71 हेक्टर क्षेत्रातून हि बांबूची तोड करण्यात आली. छत्तीसगडचे बंटी नावाचे कुणी ठेकेदार यांनी गडचिरोली जिल्ह्यातून हे बांबु ट्रक मधून वहन केले. वनपरिक्षेत्रातून आलेले बांबू खाजगी क्षेत्रातील आहे असे दाखविण्यात आले आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे भ्रष्टाचारी सोनटक्के यांच्या स्वाक्षरीने हे ट्रक कुरखेडा वनपरिक्षेत्रातुन निघाले होते. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात यावी.
भ्रष्टाचारी सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपाशी तपासामध्ये आहेत. त्याचे अहवाल अद्याप पावेतो वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त झाले नाहीत. आपला भ्रष्टाचार पैशाने लपवण्यासाठी सोनटक्के कधी वनमंत्र्याच्या स्विय सहाय्यकाची ओळख सांगतात तर कधी मुख्यमंत्र्यांच्या स्विय सहाय्यकासोबत ओळख दाखवून तपास अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांचेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
आत्ताचे वनमंत्री संजय राठोड यांचे स्वीय सहाय्यक पवार यांचेसोबत घनिष्ठ मैत्री असल्यामुळे पवार यांचे पर्यंत आपले प्रकरण गेले असून आता आपले कोणीही काही बिघडवू शकत नाही असे तपास अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारी वनाधिकारी सुनिल सोनटक्के आतापावेतो सांगत होते, आता मात्र या “फोकनाड” सोनटक्के यांनी राठोड यांचे पी.ए. पवार यांनी आपली ओळख मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक यांच्यासोबत करून दिली असून आता राज्याचे मुख्यमंत्रीचं माझ्या ताब्यात आहे, या तोऱ्यात हा सोनटक्के वागत आहे. भ्रष्टाचारातून सोनटक्के यांनी असा किती पैसा कमावला, याचा तपास खऱ्या अर्थाने वनमंत्री व मुख्यमंत्री यांनी करायलाच हवा.

“मुंह काला है झुंठ का” हे भ्रष्टाचारी सोनटक्के विसरले असतील. मरणानंतर सगळ्यांनाच “मांजरपाट” कापडामध्येच दफन व्हावे लागते, हे बहुतेक भ्रष्टाचारी पुढारी, राजकारणी, अधिकारी विसरले म्हणून सद्यस्थितीत कोरोणाने माणसाला त्याची लायकी दाखविली आहे. तरी ही “माणूस” मात्र अद्याप वठणीवर आला नाही. “याद कर सिकंदर को……., जब गया था दुनिया से, दोनो हाथ खाली ते…” एवढेचं यानिमित्ताने भ्रष्टाचार्‍यांना सांगावेसे वाटते विशेष करून सोनटक्के यांना …!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here