Home चंद्रपूर धक्कादायक :- पदाचा गैरवापर करून महापौर राखी कंचर्लावार यांचा कोट्यावधीचा अतिक्रमण...

धक्कादायक :- पदाचा गैरवापर करून महापौर राखी कंचर्लावार यांचा कोट्यावधीचा अतिक्रमण घोटाळा ?

 

राखी कंचर्लावार यांनी स्वतःचे बेकायदेशीर घर बांधकाम व नातेवाईकांचे कोट्यावधी रुपयाचे अवैध अतिक्रमने आणि बांधकामे वाचविण्यासाठी महापौर पद मिळविले असल्याची चर्चा.

सुधीर मुनगंटीवार यांच्या गप्प राहण्यामागील रहस्य कधी उलगडणार ?

चंद्रपूर मनपाचा भ्रष्ट कारभार भाग – ८

खरं तर चंद्रपूर महानगर पालिकेत महापौर राखी कंचर्लावार यांनी संपूर्ण महानगर पालिकाच आपल्या कब्जात घेतली असून दस्तुरखुद्द माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वडिलांना महापौर राखी कंचर्लावार यांच्या नातेवाईकांचे मनपा च्या जागेवर अतिक्रमण व अवैध बांधकाम हटविण्यासाठी मनपा आयुक्त यांना निवेदन द्यावे लागत आहे, यापेक्षा भाजप पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्यासाठी दुर्भाग्य ते कुठले ? त्यामुळे भाजप सत्ताधाऱ्यांना ही बाब नक्कीच आत्मचिंतन करायला लावणारी असून जिथे पालकमंत्र्यांच्या वडिलांनाच न्याय मिळत नसेल तिथे सर्वसामान्यांना ह्या महापौर काय न्याय देत असतील ? हा आणखी गंभीर प्रश्न आहे, त्यामुळे राखी कंचर्लावार यांना दिलेले महापौर पद सार्थक ठरले का ? हा प्रश्न आता भाजप कार्यकर्ते सुधीर मुनगंटीवार यांना विचारत आहे. पण सुधीर मुनगंटीवार यांचे या प्रकरणात गप्प राहण्याचे रहस्य अजून समोर आलेले नाही.

राखी कंचर्लावार यांच्या नातेवाईक असलेल्या साईबाबा वार्ड, जेटपुरा वार्ड यासह वडगाव प्रभागातील कंचर्लावार कुटुंबीय यांनी स्नेहनगर येथील आकाशवाणी ते वडगाव डी.पी. रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक ११६/४ या शाळेसाठी व नंतर क्रिडागंण यासाठी आरक्षित जागेवर अतिक्रमण केले व तिथे बेकायदेशीर लॉन व कैटरिंग सुरू करून रोडवर सुद्धा अतिक्रमण केल्याने स्नेहनगर येथील शेकडो महिला ब पुरुषांनी याचा कडाडून विरोध केला, ही जागा आजच्या किंमतीं नुसार तब्बल १० कोटी पेक्षा जास्त किमतीची असल्याचे बोलल्या जात आहे त्यामूळे या संदर्भात माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वडील सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने काही जेष्ठ नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे या बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकामाला हटविण्याची मागणी केली होती, मात्र सत्तेत बसलेल्या राखी कंचर्लावार यांनी जाणीवपूर्वक आयुक्तांवर दबाव आणून त्यांच्या नातेवाईकांचे अतिक्रमण वाचविले.

राखी कंचर्लावार यांना खरं तर सुधीर मुनगंटीवार यांनी जे महापौर पद दिले त्या पदाची गरीमा आणि त्या पदाला न्याय त्या देवू शकत नाही नव्हे त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अवैध अतिक्रमण आणि बांधकाम ज्या पद्धतीने शहरातील महानगर पालिका जागेवर व नझुल च्या जागेवर दिसत आहे ते वाचविण्यासाठीच राखी कंचर्लावार यांनी महापौर पद मिळविले असल्याची सुद्धा चर्चा असून भाजप मधे एकापेक्षा एक नगरसेवक यांची महापौर पद सांभाळण्याची पात्रता असताना बेकायदेशीर बांधकाम करून व आपल्या नातेवाईकांच्या बेकायदेशीर बांधकामांना वाचविण्यासाठी जर राखी कंचर्लावार महापौर झाल्या असतील तर त्यांना त्या पदावरून पायउतार करणे हे भाजप हितासाठी महत्वाचे आहे आणि विशेष म्हणजे ज्या महापौर सुधीर मुनगंटीवार यांचेच ऐकत नसेल तर त्या काय खाक भाजप पक्षासाठी काम करेल ? त्यामुळे सत्तेसाठी काँग्रेस सोडून भाजप मधे आलेल्या राखी कंचर्लावार यांना महापौर पदावरून हाकलून देण्याची मागणी भाजप मधील सक्रिय गटाने केली आहे. त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवार हे काय निर्णय घेतात व महापौर राखी कंचर्लावार यांची कशी कान उघडनी करतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here