Home चंद्रपूर सनसनिखेज:- पडोली पोलिसांनी अवैध दारू पुरवठा करणाऱ्या राजू पेलेचे रहस्यमयरित्या गुन्ह्यातून नाव...

सनसनिखेज:- पडोली पोलिसांनी अवैध दारू पुरवठा करणाऱ्या राजू पेलेचे रहस्यमयरित्या गुन्ह्यातून नाव घेतले मागे ?

 

72 दारू पेट्यासह आरोपी पकडल्या नंतर आरोपींनी भालर येथील देशी दारू दुकानदार राजू पेले यांच्या दुकानातून दारू आणल्याची केली होती कबुली ?

चंद्रपूर /पडोली:- 

घूग्गूस येथील रहिवाशी असलेल्या अनेकांची वणी तालुक्यात देशी दारू दुकाने व बियर बार आहेत त्यांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरपना तालुक्यात व गडचांदूर परिसरात मोठ्या प्रमाणात दारू तस्कराच्या माध्यमातून दारू पुरवठा केल्या जातो , विशेष म्हणजे दारू तस्करा कडून पोलीसानी दारू पकडली तर केवळ त्या दारू तस्करावर कारवाई होते मात्र ती दारू ज्या देशी दारू दुकानातून किंव्हा बियर बार मधून आणल्या जाते त्यांच्या मालकांवर पोलिस कधीच कारवाई करीत नाही, याचे कारण असे आहे की ह्या दारू दुकान व बियर बार मालकांची अगोदरच संबंधित पोलिस स्टेशन मधे सेट्टिंग असते,

असाच एक मामला पडोली पोलिस स्टेशन अंतर्गत समोर आला असून आरोपी दारू तस्कर यांनी भालर येथील राजू पेले यांच्या देशी दारू दुकानातून तब्बल 72 पेट्या देशी दारू आणली असल्याची आरोपींनी पोलिसांसमोर कबुली दिल्यानंतर या गुन्ह्यात राजू पेले यांचा आरोपी म्हणून समावेश होता त्यामुळे या प्रकरणातील तपास अधिकारी यांनी राजू पेले यांचे नाव समोर आल्याने त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला पण वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यासोबत असलेल्या राजू पेले यांच्या सेट्टिंग मुळे त्या तपासी अधिकारी यांना अगदी कमी रकमेत समाधान मानून माघारी फिरावे लागले होते. अर्थात आता राजू पेले यांना वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचा आशीर्वाद असल्याने त्यांची या प्रकरणा तून अलगद सुटका झाली आहे. पण आता पडोली पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धती वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, यामधे ठाणेदार कासार आणि चौकशी अधिकारी यादव यांच्या आपसी सहमतिने राजू पेले यांचे नाव गुन्ह्यातून काढले असल्याची चर्चा आहे अर्थात पडोली येथे पोलिसांच्या आशीर्वादाने त्रीमुर्ती धाब्यावर खुलेआम अवैध दारू विक्री जोरात चालत असतांना ती कुणाच्या आशीर्वादाने आहे हे सांगण्याची गरज नाही त्यामुळे पडोलीच्या या अवैध दारू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here