Home चंद्रपूर खळबळजनक :- महापौर यांच्या नातेवाईकांचे अवैध अतिक्रम हटविण्यासाठी चक्क सुधीर मुनगंटीवार यांच्या...

खळबळजनक :- महापौर यांच्या नातेवाईकांचे अवैध अतिक्रम हटविण्यासाठी चक्क सुधीर मुनगंटीवार यांच्या वडिलांची आयुक्तांकडे तक्रार,

 

तरीही चंद्रपूर  मनपा प्रशासन साखर झोपेत कसे ?
वडगाव येथील सर्व्हे क्रमांक ११६/४ यावर महापौर कंचर्लावार यांच्या  नातेवाईकांचे बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकाम. 

चंद्रपूर मनपा भ्रष्ट कारभार भाग – ७

चंद्रपूर मनपा प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या इशार्यावर चालत असल्याने केवळ सत्ताधाऱ्यांचे हित तेवढे जोपासले जात असून बाकीच्यांना कायद्याचा धाक दाखवून त्यांचे बांधकाम तोडल्या जाते पण आश्चर्याची बाब म्हणजे दस्तुरखुद्द तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वडील सच्चिदानंद संबाशिव मुनगंटीवार यांनी विद्यमान महापौर राखी कंचर्लावार यांच्या नातेवाईक असलेल्या कंचर्लावार यांचे वडगाव येथील सर्व्हे क्रमांक ११६/४ यांवर अवैध अतिक्रमण रस्त्यांवर असल्याने व क्रिडागंणा करिता राखीव असलेल्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून त्या भोवती वॉल कंपाउंड़ बांधले असल्याची तक्रार मनपा आयुक्त यांना दिली पण चंद्रपूर मनपा मधे भाजप सत्तेवर असताना सुद्धा जर त्यांच्या नेत्यांच्या (पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ) वडिलांच्या शब्दाला किंमत नसेल आणि त्यांच्या निवेदनाची दखल जर मनपा आयुक्त घेत नसेल तर कंचर्लावार यांनी भाजप नेते तथा माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सुध्दा कशी मात करून आपले स्वतःचे चंद्रपूर मनपा मधे वर्चस्व तयार केले, हे यावरून स्पष्ट होते. खरं तर जे सुधीर मुनगंटीवार यांना आपला नेता मानतो ते चंद्रपूर मनपा मधे सत्तेत आहे त्यांना याची लाज कशी वाटत नाही ? हा गंभीर प्रश्न आहे, अर्थात ज्या सुधीर मुनगंटीवार यांच्या पुण्याईने कंचर्लावार यांना महापौर पद मिळाले त्याच महापौर जर सुधीर मुनगंटीवार यांच्या वडिलांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवून मी म्हणेन तो कायदा असा व्यवहार करणार असेल तर बाकीच्यां उपमहापौर,स्थायी समिती सभापती यांनी काय हातात भरलय? हेच कळायला मार्ग नाही. मात्र महापौर कंचर्लावार यांच्या त्या नातेवाईकांनी ती कोट्यावधी रुपयाची जागा कशी हडपली व त्यामागे काय हेरफेरी केली याचे पूर्ण दस्तावेज समोर आले असून महापौर कंचर्लावार यांचे सदस्यत्व व सोबत महापौर पद पण रद्द होऊ शकते अशीच एकूण स्थिती दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here