Home गडचिरोली सनसनिखेज :- भ्रष्ट वनाधिकारी सोनटक्के यांच्या फोकणाड्या, म्हणे “पॉवर”नी वनमंत्र्याचा दौराचं केला...

सनसनिखेज :- भ्रष्ट वनाधिकारी सोनटक्के यांच्या फोकणाड्या, म्हणे “पॉवर”नी वनमंत्र्याचा दौराचं केला रद्द!

 

 

चौकशीत दोषी आढळल्यानंतर सुद्धा सोनटक्के यांच्या वल्गना !

कुरखेडा प्रतिनिधी :-

गडचिरोली वनवृत्तामधील कुरखेडा वनपरिक्षेत्रात वनविभागाला करोडो रुपयांच्या चूना लावणारा कुरखेडा यांचा प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सोनटक्के यांचे भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण आता चौकशी मध्ये आहेत. त्यात ते दोषी आढळतील असा अहवाल आला आहे परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत लेण-देन च्या माध्यमातून अद्याप पोहोचविण्यात आलेला नाही, साप्ताहिक “भूमिपुत्रांची हाक” न्युज पोर्टल ने यापूर्वी सोनटक्के यांचे अनेक प्रकरण उघडकीस आणले होते. तत्पूर्वी सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. नुकत्याच आयोजित झालेल्या वनमंत्री च्या दौर्‍यामध्ये सोनटक्के यांच्या प्रकरणाचे पुराव्यानिशी भांडाफोड भुमिपुत्राची हाक वनमंत्र्यांच्या समक्ष करणार होता. वनमंत्र्याच्या खाजगी पी.ए. सोबत माझे वैयक्तिक संबंध आहेत. मी वरच्या स्तरावर तसं ॲडजस्टमेंट केला आहे असे सांगून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, तपास अधिकाऱ्यांना आणि समकक्ष अधिकाऱ्यांना दबाव आणण्याचे षड्यंत्र भ्रष्टाचारी वनाधिकारी सुनील सोनटक्के यांनी रचले होते त्यांच्या याच भ्रष्टाचाराचे पुरावे साप्ताहिक भुमिपुत्राची हाक वनमंत्र्यांनी देणार होता परंतु एकाएकी वनमंत्र्यांच्या दौरा रद्द झाला. हा दौरा आपणच रद्द केला असे आता भ्रष्टाचारी सोनटक्के सांगत सुटला आहे. आपल्या भ्रष्टाचारावर पडदा पडावा यासाठी नियमांचे उल्लंघन करून रजेवर गेलेले सोनटक्के यांनी आता चालविलेली ही खेळी मात्र वनमंत्र्यांच्या जिव्हारी लागू शकते. वनमंत्री ही माझेच, त्यांचे पी.ए. ही माझेच, वरिष्ठ अधिकारीही माझेच असे गृहीत धरणारा भ्रष्ट सोनटक्के आता वनमंत्र्यांच्या दौराही मीच रद्द केला असे खुलेआम सांगत सुटला आहे. स्वतः वनमंत्र्यांनी या भ्रष्ट सोनटक्के यांची चौकशी करून त्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांचे पूर्ण कपडे उतरवायला हवे असे त्याचे समकक्ष अधिकारी आता बोलत आहेत. सुनील सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी झाल्यास वनविभागातील महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा भ्रष्टाचार उघडकीस होऊ शकतै, यात संशय नाही. भ्रष्टाचारी सोनटक्के यांनी वनविभागात येणारा संपूर्ण पैसा हडप केला असून 75 टक्के कामांमध्ये त्यांनी फक्त भ्रष्टाचार केला आहे असे त्यांचे सहकर्मी सांगत असतात. त्यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक उदाहरणे पुराव्यासहित साप्ता. भुमिपुत्राची हाक ने पूर्वी प्रकाशित केले आहे. यापूर्वीही त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असून तपास अधिकार्‍यांना खरेदी करण्याचे षड्यंत्र व स्वतःच्या नसलेल्या पावरच्या दुरुपयोग याठिकाणी सोनटक्के यांनी केला असल्यामुळे भ्रष्टाचाराच्या त्यांच्या कार्यावर लिपापोतीचे कार्य सध्या सुरू आहे. भ्रष्टाचारानी माजलेला सोनटक्के आता वनमंत्रीच आपल्या खिशात असल्याची करत असलेली बतावणी म्हणजे “लई झालं” असंच म्हणावे लागेल. वनमंत्र्यांनी आता भ्रष्टाचारी सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाकडे स्वत: लक्ष घालावे भूमिपुत्राची हाक या संदर्भात वनमंत्री यांचेकडे लवकरच पाठपुरावा करणार आहेत.

चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात वनमंत्री संजय राठोड यांच्या दोन दिवसाच्या दौरा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी वनमंत्री वन विभागाची आढावा बैठक घेणार होते, काही राजकीय कारणांनी हा दौरा रद्द करण्यात आला तू त्या दिवशी गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेत.पण अखेर “वनमंत्री राठोड” चंद्रपूरला आलेच नाहीत…!

Previous articleखळबळजनक :- अवैध दारू विक्रेत्यांचा अड्डा बनलेल्या घूग्गूस मधील अट्टल दारू माफियांवर पोलिस मेहरबान ?
Next articleखळबळजनक :- महापौर यांच्या नातेवाईकांचे अवैध अतिक्रम हटविण्यासाठी चक्क सुधीर मुनगंटीवार यांच्या वडिलांची आयुक्तांकडे तक्रार,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here