Home चंद्रपूर खळबळजनक :- अवैध दारू विक्रेत्यांचा अड्डा बनलेल्या घूग्गूस मधील अट्टल दारू माफियांवर...

खळबळजनक :- अवैध दारू विक्रेत्यांचा अड्डा बनलेल्या घूग्गूस मधील अट्टल दारू माफियांवर पोलिस मेहरबान ?

 

वणी तालुक्यातील राजुर काॅलरी येथे जयस्वाल, वणी येथील डोर्लीकर, भालर काॅलनीत राजू अन्न्ना, तिवारी, कैलासनगर (मुंगोली) येथील नागराज करपका, राजू कलवल यांच्यावर कारवाई होणार कधी ?

दारूकट्टा:- भाग – १

घूग्गूस मधील रहिवाशी असलेले अनेक दारू तस्कर यांच्या वणी तालुक्यात असलेल्या देशी दारू दुकान, बियर बार व देशी भट्टी मधून अवैध दारू मोठ्या प्रमाणात घूग्गूस मार्गे चंद्रपूर जिल्ह्यात पोहचवील्या जाते, मिळालेल्या माहितीनुसार वणी तालुक्यातील राजुर काॅलरी येथे जयस्वाल, वणी येथील डोर्लीकर व भालर काॅलनीत राजू अन्न्ना,तिवारी, कैलासनगर (मुंगोली) येथील नागराज करपका, राजू कलवल यांच्या बियर बार व देशी दारुच्या भट्टीतून चंद्रपूर जिल्ह्यात दारु तस्करी होत आहे. या अवैध दारू तस्करी च्या धंद्यात घूग्गूस मधील रहिवासी असलेले दारू तस्कर यांचा मोठा सहभाग आहे, महत्वाची बाब म्हणजे एकीकडे पोलिसांकडून ५ ते १० पेटी नेणा-या दारु तस्करांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. परंतु ज्या ठिकाणाहून ही अवैध दारू मोठ्या प्रमाणात पुरवठा केल्या जाते त्या वणी तालुक्यातील दारू पुरवठा करणाऱ्या दुकानदारावर कारवाई का केल्या जात नाही? हा खरा प्रश्न असून पोलिसांना हे अवैध दारू पुरवठा करणारे हप्ते देतात त्यामुळेच पोलिस त्यांना पकडत नसल्याची बाब आता उघड होत आहे.

२०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात संपुर्ण दारूबंदी घोषित झाल्यानंतर नागभीड येथे उपपोलीस निरीक्षक छत्रपती चिडे या कर्तव्यदक्ष पोलीस अधिका-याची दारु तस्करांनी हत्या केली. त्यानंतर चंद्रपूर शहरात एका दारू तस्कराने सहायक पोलिस निरीक्षक यांच्यावर व शेगाव पोलिस स्टेशन मधील सहायक पोलिस निरीक्षक व हवालदार यांच्यावर प्राणघातक हमला केला होता. पण त्यानंतर सुद्धा अवैध दारू तस्करी मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या आशीर्वादाने सतत सुरू आहे.

पडोली येथे lcb टीम ने 30 आगस्टला रात्री 10:30 वाजता कोसारा चौक चौक इथे गस्त घालताना डस्टर (कार) क्रमांक MH 49 B 8550 मधे ठेवलेली 72 पेटी देसी दारू जप्त केली त्या प्रकरणात घुग्घुस येथील तथाकथित कामगार नेते यांचे बंधू अली सरफुद्दीन सैय्यद, अमित कुंभारे, दीपक वर्मा, विक्की जंगम या चार युवकांना अटक केली होती. अर्थात ही देशी दारू भालर येथील राजू अन्ना यांच्या देशी दारू दुकानातून आलेली आहे असे चर्चेतून समोर आले असताना पोलिसांनी त्या भालर येथील देशी दारू दुकानदारावर कारवाई का करण्यात आली नाही हा प्रश्न चिंतेचा आहे. त्यामुळे घूग्गूस ठाणेदार, पडोली ठाणेदार आणि गडचांदूर पोलिस स्टेशन ठाणेदार यांच्या माध्यमातून पकडलेल्या दारूचा पुरवठा करणाऱ्या मुख्य दारू तस्करावर कारवाई होत नाही, कारण हे मुख्य दारू तस्कर ह्या तिन्ही पोलिस स्टेशन च्या ठाणेदार यांना हप्ता देत असल्याची चर्चा आहे, विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेने पडोली येथे पकडलेल्या दारू संदर्भात मोठा खुलासा झाला असून ह्या दारू तस्कराना 25 पेट्या दारू विक्रीची परवानगी lcb कडून होती पण 70 पेटी दारू मिळाल्याने lcb च्या दुसऱ्या टीम ने त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here