Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :- चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येणारे लॉक डाऊन सद्ध्या स्थगित.

ब्रेकिंग न्यूज :- चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येणारे लॉक डाऊन सद्ध्या स्थगित.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मनसुब्यावर फिरले पाणी ?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात 29 ऑगस्ट ला मा पालकमंत्री विजय वडडेट्टीवार यांनी 3 सप्टेंबर पासून एक आठवडा लॉकडाऊन करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र त्यानंतर केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार कोणतेही राज्य, जिल्हा यांना केंद्र शासनाची परवानगीशिवाय लॉक डाऊन करता येणार नाही. त्यामुळे लॉक डाऊनच्या परवानगी साठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र त्याला अद्याप परवानगी मिळाली नसल्यामुळे उद्या 3 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणारे लॉकडाऊन सध्या स्थगित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली. शासनाची परवानगी मिळाल्यानंतर यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

Previous articleधक्कादायक :- प्रभारी उपविभागीय वन अधिकारी सोनटक्के हे कारवाई च्या भीतीने गेले रजेवर ?
Next articleखळबळजनक :- अवैध दारू विक्रेत्यांचा अड्डा बनलेल्या घूग्गूस मधील अट्टल दारू माफियांवर पोलिस मेहरबान ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here