Home गडचिरोली धक्कादायक :- प्रभारी उपविभागीय वन अधिकारी सोनटक्के हे कारवाई च्या भीतीने गेले...

धक्कादायक :- प्रभारी उपविभागीय वन अधिकारी सोनटक्के हे कारवाई च्या भीतीने गेले रजेवर ?

मनसेची वन मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार गेल्याने सोनटक्के यांचे निलंबन होणारच !

कुरखेडा प्रतिनिधी :-

उपविभागीय वन अधिकारी म्हणून प्रभार सांभाळणाऱ्या सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराच्या चुरस कथा वन विभागामधे नवे नवे किर्तिमान रचत असतानाच आता चक्क विभागीय चौकशीत दोषी आढळलेले सोनटक्के हे होणाऱ्या कारवाईतून वाचण्यासाठी चक्क रजेवर गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोनटक्के यांनी 27 हजार झाडे लावण्याच्या कामात, वन समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या अनुमती शिवाय साहित्य खरेदी कामात व रस्ते बांधकामा च्या कामात कोट्यावधीचा निधी हडप केला असल्याची चौकशी झाल्याने त्यात ते दोषी आढळले त्यामुळे आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होईल अशी शक्यता बळावली असल्याने सोनटक्के हे वन मंत्री यांच्या भेटीला गेले होते व त्यांच्या स्विय सहाय्यक यांच्या माध्यमातून चौकशी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालवीलेला होता पण भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल वर सोनटक्के यांच्या सर्व व्यक्तिगत हालचालींवर लक्ष असल्याने त्यांची पोल खोल झाली आणि वन मंत्री यांनी सुद्धा सोनटक्के यांना वाऱ्यावर सोडले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता सगळं संपल त्यामुळे “मरता क्या नही करता” म्हणून शेवटची घटका मोजत असलेल्या सोनटक्के यांनी कार्यालयीन रजा घेवून वरिष्ठांकडून निलंबनाची कारवाई होऊ नये यासाठी धावपळ चालवलेली आहे. मात्र भुमिपूत्राच्या हाक न्यूज पोर्टल मधील सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराच्या संबंधित वृत्तमालिकांची तक्रार वनमंत्र्याच्या कार्यालयात मनसे च्या माध्यमातून लवकरचं पोहोचणार असून, भ्रष्टाचारी वनाधिकारी सोनटक्के हे आपली वरिष्ठ स्तरावर ओळख असल्याने जो चौकशी दडपण्याच्या प्रयत्न करित आहे असे सांगण्यात येत आहे. परंतु सोनटक्के हे लवकरचं तोंडघशी पडणार, हे निश्चित आहे. किती ही फुदका “मुंह काला है झुंठ का” ही परीस्थिती भ्रष्टाचारी सोनटक्के यांना बघावीचं लागेल. त्यांच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर “भुमिपुत्राची हाक” पोर्टल लक्ष ठेवून आहे, यासाठी त्यांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. “भिती चोरांना असते सावांना नाही” ही म्हण सोनटक्के काळ्या कमाई च्या माजात बहुतेक विसरले असतील.आता तर सोनटक्के यांच्या भ्रष्टाचारांची पोलखोल वन विभागांच्या मुख्य सचिवाकडे गेल्याने जिल्हा व विभागीय स्तरावर सोनटक्के हे कारवाईतून वाचूच शकत नाही तरीही रजा घेवून आपल्या गोट्या चालविण्यात सोनटक्के यांनी कार्यालयीन सुट्टी घेतली असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here