Home चंद्रपूर सनसनिखेज:- चंद्रपूर मनपाच्या महापौर राखी कंचर्लावार यांच्या घराचे बांधकामच अवैध ?

सनसनिखेज:- चंद्रपूर मनपाच्या महापौर राखी कंचर्लावार यांच्या घराचे बांधकामच अवैध ?

नगरसेविका सुनीता लोढिया यांनी आयुक्तांकडे तक्रार दिल्यानंतर सुद्धा कारवाई का नाही ?

चंद्रपूर मनपाचा भ्रष्ट कारभार भाग :-6

चंद्रपूर महानगर पालिकेत प्रशासन नेमके कुणाचे हस्तक झाले ? हेच मुळात कळत नसून एकीकडे गोरगरीब पीडित आणि सर्वसामान्य जनतेच्या अवैध बांधकामाला कुठलीही नोटीस किवा तोंडी माहिती न देता ते बांधकाम त्वरित तोडल्या जाते आणि सत्ताधारी यांच्या नातेवाईकांना व धन दांडग्याना विशेष सूट देवून त्या अवैध बांधकामाचे संरक्षण केल्या जाते तर मग अशा नगरसेवक व नगरसेविका व सत्ताधाऱ्यांवर नगरसेवक पद रद्द करण्याची तरतूद असताना त्यांच्या विरोधात कुणी नगरसेवक व राजकारणी का जात नाही ? हा प्रश्न सुद्धा चिंतन करायला लावणारा आहे, खरं तर चंद्रपूर महानगर पालिकेत विरोधी पक्ष कुठे आहे ? याचा शोध लागत नाही आणि त्यामुळेच प्रभावी विरोधी पक्ष नसल्याने सत्ताधारी यांचे फावलें आहे आणि ते नको ते निर्णय घेवून आपल्या नातेवाईक व समर्थकांच्या अवैध बांधकामाना वाचविण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करतात पण आता तर चक्क चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार यांच्या वडगाव प्रभाग मधील साईबाबा मंदिराच्या बाजूला असलेल्या घरांचे बांधकामच अवैध असल्याची सनसनिखेज माहिती समोर आली असून काँग्रेस च्या नगरसेविका सुनीता लोढिया यांनी सदर अवैध बांधकाम हे मंजूर नकाशा पेक्षा जास्तीचे व सर्व नियम धाब्यावर बसवून बांधकाम केल्याने ते पाडण्यात यावे अशी मागणी १६/८/२०१७ ला व २३/३/२०१८ केली होती पण मनपा प्रशासनाने ते बांधकाम तोडले नाही, मग सर्वसामान्यांना एक कायदा आणि सत्ताधारी यांना दुसरा कायदा कसा ? हा प्रश्न अतिशय महत्वाचा असून चंद्रपूर महानगर पालिका ही लोकशाही पद्धतीने चालत नाही तर ती सत्ताधारी यांच्या हुकूमशाही पद्धतीने चालत आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. आणि म्हणूनच जेटपुरा गेट जवळील राखी कंचर्लावार यांच्या नातेवाईकांनी महानगर पालिकेच्या जागेवर लॉक डाऊन च्या काळात अतिक्रमण केलय ते तोडल्या जात नाही, डॉ. गुलवाडे यांच्या रुग्णालयात समोरील प्रदीप नालमवार यांचे बेकायदेशीर बांधकाम तोडल्या जात नाही मग चंद्रपूर शहरातील जनतेने यांना शहरातील मोक्याच्या जागा हदपण्यासाठी आणि बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना सरक्षण देण्यासाठी निवडून दिले का ? हा प्रश्न जनतेने यांना विचारायला हवा तरच या सत्ताधारी यांची गुर्मी कमी होईल मात्र जनतेचा उद्रेक झाला तर काय होईल याची कल्पना नसलेल्या सत्ताधारी यांच्या एवढ्या भ्रष्ट कहाण्या आहे की जनतेच्या उर्मी लागल्या तर यांचे तख्त च उखडून जाईल मात्र यासाठी कोण समोर येईल ? हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleलक्षवेधी ;- चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या त्या बातमीचे रहस्य आणि चर्चेची खबरबात !
Next articleधक्कादायक :- प्रभारी उपविभागीय वन अधिकारी सोनटक्के हे कारवाई च्या भीतीने गेले रजेवर ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here