Home चंद्रपूर लक्षवेधी ;- चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या त्या बातमीचे रहस्य आणि चर्चेची खबरबात...

लक्षवेधी ;- चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या त्या बातमीचे रहस्य आणि चर्चेची खबरबात !

एकमेकांची रस्सीखेच राजकीय आणि पत्रकारितेत घातक !

लक्षवेधी :-

“राजकारण हा बदमाशाचा शेवटचा अड्डा आहे” असं म्हटल्या जातं. ते एकदम बरोबर आहे कारण राजकारण्यांच्या संरक्षणातच चोर बदमाश गुंड यांची चलती असते, पण आता पत्रकारिता ही सुद्धा बदनाम झालेली आहे. नव्हे, पत्रकारिता म्हणजे अवैध काळे,धंदे, भ्रष्टाचार आणि चीरीमीरी यासाठी सरक्षण म्हणून पर्याय ठरली आहे.शिवाय सुपारी घेवून एखाद्याचे राजकीय सामजिक भविष्य संपविण्याचा सुडबुद्धीने कट रचणारी व्यवस्था सुद्धा बनलेली आहे आणि आता तर गल्लोगल्ली पत्रकार म्हणून मिरविनाऱ्या बोगस पत्रकारांची फौज तयार झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे. खरंतर एकेकाळी देशात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतीची मशाल पेटवणारी पत्रकारिता आता देशातील राजकीय सत्तेची दाशी झाली आहे, नव्हे पत्रकारिता ही बाजार व्यवस्था बनली आहे आणि त्यामुळेच जनतेचा पत्रकारितेवर विश्वास राहिला नाही, पण तरीही काही सच्चे पत्रकार समाज मनाचा आरसा बनून सामजिक बांधिलकी जोपासत असल्याने पत्रकारितेची काही प्रतिष्ठा राखून आहे, मात्र दुःखाची बाब म्हणजे अशा सच्च्या पत्रकारांना सुद्धा बदनाम करण्यासाठी बोगस पत्रकारांचा वापर होतो, त्यामुळे ही पत्रकारिता नेमकी कुठे जात आहे ? हेच कळायला मार्ग नाही.

काही दिवसापूर्वी एका राजकीय नेत्यांच्या व्यक्तिगत जीवनावर भाष्य करणारी व केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्य आणि दिल्लीचे तख्त हलविणारी सनसनिखेज बातमी एका न्यूज पोर्टल वर प्रकाशित झाली त्यामुळे जिल्ह्यात जणू राजकीय भूकंप झाला अशीच एकूण परिस्थिती निर्माण झाली होती , या बातमीमुळे त्या राजकीय नेत्यांच्या कुटुंब व आप्तस्वकीय इष्टमित्रांमधे कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्यामुळे त्यांनी पण त्याचे उत्तर म्हणून त्या न्यूज पोर्टल च्या संपादकांच्या चारित्र्यांचे धिंडवडे प्रतिबातमीची स्क्रिप्ट लिहून काढले शिवाय
“वाचा लवकरच : नेत्याने केली वासनेच्या कळसातून गनफायरिंग…. !!!” व “टीप. पुढील भागात या महिलेच्या तथाकथित नवऱ्याची आपबीती आणि लाखो चा चुना लावणाऱ्या गरिबांची हकीकत जरूर वाचा” अशा बातमी आणि प्रतिबातम्यांची पुढील अंकाची तयारी बघता वातावरण चिघळेल अशी शक्यता होती मात्र दुसरी बातमीच रहस्यमयरित्या गायब झाल्याने दोन्ही बाजूकडून समझोता झाला की दोन्ही गटांनी “आता पुरे झाले” म्हणून एकमेकांचा नाद सोडला हे जिल्ह्यातील वाचकांना कळलं नाही एवढं मात्र खरं.

आता त्या बातमी संदर्भात जिल्ह्याच्या राजकारणात धुरळा उडाला असल्याने त्याची चर्चा काही थांबता थांबत नाही, मग तो नेता कोण ? ती महिला कोण ? आणि ती दुसरी महिला कोण ? आता त्या नेत्यांचे राजकीय भविष्य उध्वस्त होणार का ? त्या महिला आता काय पवित्रा घेणार? या व अशा नानाविध प्रश्नांची चर्चा व्हायला लागली आहे, पण खरं तर कुणाच्या व्यक्तिगत जीवनात ढवळाढवळ करणे व कुणाच्या राजकीय जीवनाचे व्यक्तिगत चारित्र्य हनन करणे हे कुणाही पत्रकारिता क्षेत्राच्या साहित्यकोशात नाही.त्यामुळे भारतीय राज्य घटनेने जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आणि विशेष म्हणजे आता तर सर्वोच्य न्यायालयाने 497 कलम रद्द केलं त्या अर्थाने प्रत्येकाला आपले शारीरिक सबंध कूणासोबत जोपसायचे याचे स्वातंत्र्य दिले असल्याने कायदेशीर मार्गाने कुणावर व्यक्तिगत लांच्छन लावण्याचा अधिकार उरला नाही. अर्थात बातमी ही बातमी सारखी असावी त्यातून राजकीय सूर निघू नये आणि त्यातून व्यक्तिगत रंगाची उधळण सुद्धा करू नये, ज्या चुका झाल्या असतील त्या चूकांना सुधारून जिल्ह्यात पत्रकारिता ही निखळ आणि जन प्रबोधन करणारी व भ्रष्टाचार, अवैध धंदे यावर अंकुश ठेवणारी व वाभाडे काढणारी व्हावी एवढाच या लक्षवेधी च्या माध्यमातून लिहिण्याचा प्रपंच !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here