Home कोरपणा सत्ताधार्यांना माजी आमदार संजयभाऊ धोटे यांच्या नावाची ऍलर्जी का?

सत्ताधार्यांना माजी आमदार संजयभाऊ धोटे यांच्या नावाची ऍलर्जी का?

प्रमोद गिरडकर कोरपना प्रतिनिधी

नवीन अभ्यासिका लोकार्पण सोहळ्याला बोलवण्यास टाळले,
————————————
भाजपच्या नगरसेवकांचा कार्यक्रमाला विरोध
————————————-
(कोरपना)
कोरपना येथे विद्यार्थ्यांकरीत आधुनिक अभ्यासिका व्हावी या करिता स्टुडन्ट फोरम ग्रुप ने मा माजी आमदार संजयभाऊ धोटे यांच्याकडे केली होती,त्यानुसार माजी अर्थ मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व आमदार संजयभाऊ धोटे प्रयत्नातून अत्याधुनिक अभ्यासिका बांधकाम करिता निधी उपलब्ध करून दिली व भव्य व देखणी अशी अभ्यासिका निर्माण झाली ,नुकत्याच झालेल्या विधानसभा निवळणुकीत वेळेवर आचारसंहिता लागल्याने लोकार्पण होऊ शकले नाही,परन्तु विधानसभा निवडणूक होऊन १० महिन्याचा कार्यकाळ झाला परन्तु लोकार्पण सोहळयाचा मुहूर्त मिळत नव्हता अखेर १ सप्टेंबर लोकार्पण करण्याचे ठरविले परन्तु माजी आमदार संजयभाऊ धोटे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने नगर पंचायत मध्ये सत्तेत असणाऱ्या सत्ताधीकार्यांनी जाणीवपूर्वक बोलवण्याचे टाळले आशा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे,त्यामुळे सत्ताधीकर्यांना मा. संजयभाऊ धोटे यांच्या नावाची ऍलर्जी का अशा सवाल उपस्थित झाला आहे.
माजी आमदार संजयभाऊ यांनी कोरपना शहराच्या विकासाठी २ कोटी निधी उपलब्ध करून दिला होता तेव्हा शुद्ध भुमीपूजन कार्यक्रमाला बोलवण्यास टाळले होते,कोरपना येथे भाजप ची सत्ता नसतानी माजी आमदार संजय धोटे यांनी २ कोटी देऊन मोठेपणा दाखवला परन्तु सत्ताधीकर्यांत मोठेपणा नाही का ? अशा सवाल निर्माण झाला आहे,
नुकत्याच झालेल्या नगर पंचायतच्या सर्वसाधारण सभेत अभ्यासिका लोकार्पण करण्याबाबत विषय ठेवण्यात आला होता परन्तु सध्या कोरोना संकट असल्याने लोकार्पण करता येणार नाही असे मा. मुख्यधिकारी कविता गायकवाड यांनी सांगितल्याने या कार्यक्रमाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही परन्तु सत्ताधीकर्यांनी सत्तेचं दुरुपयोग घेत लोकार्पण सोहळा १ सप्टेंबर आयोजित केला आहे,परन्तु या लोकार्पण सोहळ्याला माजी आमदार संजयभाऊ धोटे याना निमंत्रित न केल्याने भाजपच्या नगरसेवकांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शविला आहे,

Previous articleखळबळजनक :- चंद्रपूर मनपा मधील सहाय्यक आयुक्तांविरोधात शामराव गेडाम यांची पोलिसात तक्रार !
Next articleलक्षवेधी ;- चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या त्या बातमीचे रहस्य आणि चर्चेची खबरबात !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here