Home Breaking News स्वरांजलीचा सुमधुर आवाजाने केले चंद्रपूरकरांना मंत्रमुग्ध

स्वरांजलीचा सुमधुर आवाजाने केले चंद्रपूरकरांना मंत्रमुग्ध

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

महाराष्ट्र दिनी चंद्रपुरात सांस्कृतिक मेजवानीचा घेतला हजारो चंद्रपूरकरांनी आस्वाद

 सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मधुरा कुंभार, सिंगर प्रसेनजीत कोसंबी , सारेगमप फेम अंशिका चोणकर,

चांदा क्लब ग्राउंडवर रसिकांची भरगच्चं गर्दी

चंद्रपूर  :-  अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित महाराष्ट्र दिनाच्या पावनपर्वावर चंद्रपुरकरांना स्वरांजली या सांस्कृतिक संगीत महोत्सवाची मेजवानी देण्यात आली. चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंड येथे महाराष्ट्र दिनानिमित्त सायंकाळी ७ वाजता पासून रात्री १० वाजेपर्यंत सारेगाम फेम गायकांची संगीत मैफिल जोरदार सजवली. यावेळी चंद्रपूरकर मंत्रमुग्ध झाले होते,

 

यावेळी स्वरांजली महोत्सवात सुर नवा ध्यास नवा, सा रे ग म प झी मराठी फेम, 57 व्या महाराष्ट्र राज्यात चित्रपट पुरस्कार विजेती , सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मधुरा कुंभार, सारेगमप, इंडियन आयडल, सुर नवा ध्यास नवा फेम प्लेबॅक सिंगर प्रसेनजीत कोसंबी , द केरला स्टोरी प्लेबॅक सिंगर, सुर नवा ध्यास नवा उपविजेती सारेगमप फेम अंशिका चोणकर, यांनी विविध गाण्याचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाला शहरातील रामू तिवारी, नंदू नागरकर , सुनीता लोढिया , adv विजया बांगडे, नम्रता आचार्य, भालचंद्र दानव, आश्र्विनी खोब्रागडे, संजय वैदय, प्रितीश सहारे, हर्ष चांदेकर, आदी. मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमादरम्यान एकलव्य मॉडेल रेसिडेन्सील स्कूल देवाडा येथील अदिती उमेश जुमनाके , प्रितिका जंगू करपाते, सुनीता शामराव मेश्राम , अर्जुन विज्जु वेलादी, गौरव चित्तरंजन कोवे या विद्यार्थ्यांनी JEE मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे, त्यांना यावेळी आयोजकांच्या वतीने शाल, स्मृतीचिन्ह, आणि प्रत्येकी ५००० रुपये रोख मदत यावेळी करण्यात आली.

यानंतर नाट्यरंग मंच चंद्रपूरचे बकुळ धवणे, यांचा सत्कार करण्यात आला.सोबतच नीट मध्ये देशातून ७७ वी आणि महाराष्ट्र राज्यातून प्रथम आलेल्या श्रद्धा आवताडे हीचा सत्कार वडिलांच्या उपस्थित करण्यात आला.

सर्व सत्कार मूर्तींचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला. यावेळी अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठानचे महेश मेंढे, दिनेश दादापाटील चोखारे, रामू तिवारी, सचिन राजूरकर विनोद सातपुते, प्रमोद बोरीकर, गोलू बाराहाते, रोशन रामटेके, अविनाश मेश्राम, सचिन रणवीर, यांनी केला.

कायक्रमाचे यशश्वीतेसाठी अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिक परिश्रम घेतले.
स्वरांजली या सांस्कृतिक कायक्रमाचे संचालन प्रज्ञा जीवनकर यांनी केले. चंद्रपुरातील रसिक माय बाप प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

                            विशेष सहकार्य

सम्राट अशोक बुद्ध विहार बाबानगर बाबुपेठच्या बांधकामासाठी २५००० चा रोख मदत यावेळी देण्यात आली. यावेळी सम्राट अशोक बुद्ध विहारच्या अध्यक्ष प्रतिमा जगताप,
सचिव संध्या फुलझेले, कोषध्यक्ष रमाबाई मेश्राम यांनी सदर मदत स्वीकारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here