Home चंद्रपूर अतिक्रमण विरोधात मनपाची धडक कारवाई

अतिक्रमण विरोधात मनपाची धडक कारवाई

अतिक्रमण विरोधात मनपाची धडक कारवाई

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर: चंद्रपूर शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्या अतिक्रमणधारकांवर चंद्रपूर महानगरपालिका, पोलीस विभाग व वाहतुक पोलीस विभागाद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली असुन फुटपाथ व नालीवर असलेले अतिक्रमण काढण्यात आले आहे.

डॉ. आंबेडकर चौक ते बिनबा गेट व बिनबा गेट बाहेरील परीसरात सदर कारवाई करण्यात आली असुन अनेक दुकानदारांचे फुटपाथवर ठेवण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पत्र्याचे शेड लाऊन फुटपाथवर अतिक्रमण केले असल्याचे आढळुन आल्याने त्यांचे अतिक्रमण जेसीबीद्वारे काढण्यात आले. मागील काही दिवसांपासुन रस्त्यावरील अतिक्रमण धारकांनी स्वतः हुन अतिक्रमण काढण्याच्या सुचना मनपातर्फे ऑटोद्वारे सातत्याने देण्यात येत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून, कारवाईची तमा न बाळगता अतिक्रमण उभेच होते त्यामुळे मनपा, पोलीस विभाग व वाहतुक पोलीसांद्वारे कारवाई करण्यात आली आहे.

आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरीक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे व अतिक्रमण निर्मूलन अधिकारी राहुल पंचबुद्धे यांच्याद्वारे सदर कारवाई करण्यात आली असुन पुन्हा फुटपाथवर अतिक्रमण न करण्याच्या सूचना अतिक्रमणधारकांना देण्यात आल्या आहेत. कारवाई दरम्यान अतिक्रमण निर्मुलन पथक, पोलीस पथक पूर्णवेळ उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here