Home Breaking News अमरावतीच्या तीन आरटीओंसह नऊ जणांना अटक

अमरावतीच्या तीन आरटीओंसह नऊ जणांना अटक

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

अमरावती  :-  चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करून विक्रीप्रकरणी अमरावती येथील आरटीओच्या तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन महिन्यांच्या सखोल तपासात हे रॅकेट उघड करून एकूण ९ जणांना अटक केली आहे. टोळीचा सूत्रधार हा वापराच्या बहाण्याने ताब्यात घेतलेल्या ट्रकची अमरावती, नागपूर व इतर ठिकाणी नोंदणी करून त्यांची विक्री करत होता.

                         नागपुरात धागेदोरे ? 

जावेदचे दोन आधार कार्ड असून, तो अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आदी ठिकाणी चोरलेल्या वाहनांचे चेसिस नंबर बदलून बनावट कागदपत्रे तयार करायचा. त्याच कागदपत्रांद्वारे अमरावती, नागपूर व इतर ठिकाणी तो एजंट व आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने ट्रकची पुनर्नोदणी करायचा. त्यानंतर हे ट्रक मुंबई अथवा इतर ठिकाणच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना विकायचा. त्याने अमरावती आरटीओमध्ये ६ तर नागपूरमध्ये १९ ट्रकची नोंदणी केल्याचे समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here