Home चंद्रपूर जगाला संत परंपरेची आणि संस्कृतीची अमुल्य शिकवण देणारा महाराष्ट्र देशाचा गौरव –...

जगाला संत परंपरेची आणि संस्कृतीची अमुल्य शिकवण देणारा महाराष्ट्र देशाचा गौरव – आ. किशोर जोरगेवार महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण

जगाला संत परंपरेची आणि संस्कृतीची अमुल्य शिकवण देणारा महाराष्ट्र देशाचा गौरव – आ. किशोर जोरगेवार

महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:-महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाच्या प्रत्येक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही महाराष्ट्राने योगदान दिले आहे. ही संतांची भुमी आहे. संतांनी महाराष्ट्रातून दिलेले समाजोपयोगी विचार समाजाने स्वीकारले असून संत परंपरेची आणि संस्कृतीची अमुल्य शिकवण जगाला देणारा महाराष्ट्र देशासाठी गौरव असल्याचे असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त चंद्रपूर येथील तहसील कार्यालय येथे सकाळी 7 वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार राजू धांडे, नायब तहसीलदार प्रियंका मानकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आज 1 मे रोजी राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चंद्रपूर येथील तहसील कार्यालयातही महाराष्ट्र दिनानिमीत्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते येथील ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण होताच उपस्थितांनी तिरंग्याला सलामी देत महाराष्ट्र गीत गायले.
अनेक आव्हानांचा सामना करत आज महाराष्ट्र राज्य देशातील सर्वात विकसित राज्यात अव्वल क्रमांकावर आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण, शेती, क्रीडा, परंपरा, तंत्रज्ञान या सर्वच बाबतीत महाराष्ट्रानं नेत्रदिपक कामगिरी केली आहे. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाच्या प्रत्येक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला असल्याचे ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी तलाठी, मंडळ अधिकरी, कार्यालयीन कर्मचारी, पोलीस पथकाची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here