Home चंद्रपूर खळबळजनक :- चंद्रपूर मनपा मधील सहाय्यक आयुक्तांविरोधात शामराव गेडाम यांची पोलिसात तक्रार...

खळबळजनक :- चंद्रपूर मनपा मधील सहाय्यक आयुक्तांविरोधात शामराव गेडाम यांची पोलिसात तक्रार !

 

नरेंद्र गेडाम यांची बेकायदेशीर दोन मजली इमारत वाचविण्यासाठी संगनमत करून शामराव गेडाम यांचे विटाचे बांधकाम सहाय्यक आयुक्त शितल वाकडे यांनी तोडायला लावल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार?

महापौर राखी कंचर्लावार यांच्या नातेवाईक असलेल्या जनार्धन मेडिकल संचालकांचे मनपा जागेवरील अतिक्रमण मनपा तोडणार का ?

चंद्रपूर मनपाचा  भ्रष्ट कारभार भाग – 5

चंद्रपूर महानगर पालिका ही धन दांडगाग्यांच्या दावणीला बांधलेली सत्ताधाऱ्यांची व्यक्तिगत संस्था आहे का ? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडायला लागला आहे, कारण इथे निरपराध गोरगरिबांच्या घरांवर बुलडोजर आणि बेकायदेशीरपणे शासनाची जागा हडपुन अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांना संरक्षण मिळत असल्याची गंभीर बाब आता पूर्णतः उघड झाली असून फक्त गरीब आणि सामन्य जनतेसाठी कायदा व धनदांडगे सत्ताधारी यांच्यासाठी कुठल्याही अटी शर्ती नाही तर ही कसली लोकशाहीतील प्रशासन व्यवस्था ? काय, भाजप प्रणीत महानगर पालिका सत्ताधाऱ्यांना लोकशाही व्यवस्था नको आहे का ? की सत्ता म्हणजे हिटलरशाही समजून सर्वसामान्य जनतेला छळन्याचे यांनी केंद्र बनविले आहे ? हे कळायला मार्ग नसून लोकशाहीला घातक असे चंद्रपूर महानगर पालिका प्रशासन असल्याचे विदारक चित्र सर्वत्र दिसत आहे.

चंद्रपूर महानगर पालिकेच्या. महापौर राखी कंचर्लावार यांचे नातेवाईक जनार्धन मेडिकलचे मालक हे चक्क लॉक डाऊनच्या काळात मनपाच्या सराई बाजार असलेल्या जेटपुरा गेट जवळील जागेवर अतिक्रमण करतात तर त्यांचे अतिक्रमण हटविल्या जात नाही मग सामजिक कार्यकर्ते राजेश बेले हे कोरोनटाइन असताना त्यांचे बांधकाम तोडायची एवढी घाई मनपा प्रशासनाने का केली ? काय मनपा प्रशासनाचा कोरोनटाइन सेंटर मधील भ्रष्टाचार उघड केला म्हणून आकसापोटी त्यांचे बांधकाम तोडले का ? याबाबत एका पत्रकाराने आयुक्तांना विचारले असता त्यांनी पण अशीच कबुली दिली आहे. एकीकडे हा गोंधळ असताना दुसरीकडे बस स्टँड च्या मागील परिसरात दोन मजली बेकायदेशीर इमारत बांधकाम करणाऱ्या नरेंद्र गेडाम यांची इमारत तोडण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिल्यानंतर सुद्धा मनपा प्रशासन ते बांधकाम तोडत नाही तर उलट त्या नरेंद्र गेडाम यांनी शामराव गेडाम यांच्या जागेवर कब्जा करून सुद्धा मनपा प्रशासन स्वतःच्या जागेवर विटाचे वॉल कंपाउंड़ करणाऱ्या शामराव गेडाम यांचे कायदेशीर बांधकाम तोडतात व बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या नरेंद्र गेडाम यांचे सरक्षण करतात आणि म्हणूनच नरेंद्र गेडाम व सहाय्यक मनपा आयुक्त शितल वाकडे यांनी संगनमत करून माझे विटाचे बांधकाम पाडले त्यामुळे ह्या दोघांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी शामराव गेडाम यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. त्यामूळे आता मनपा प्रशासनाचा भ्रष्ट भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असल्याने जनतेत मोठा असंतोष खदखदत आहे. आता पोलिस प्रशासन या संदर्भात काय कारवाई करतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here