पोलिसांच्या कृपाद्रुष्टीने बेधडक दारू विक्री, महिला संतापल्या ?
मंगेश तिखट /चंद्रपूर जिल्हा
प्रतिनिधी :
कोरपना तालुक्यातील नारंडा हे गाव सद्ध्या चर्चेचा विषय ठरत असून या गावात मागील अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडलं आहे.दरम्यान तंटामुक्ती अध्यक्ष येथील सरपंच आणि पोलीस पाटील नेमक्या कुठल्या भूमिकेत आहे हेच कळायला मार्ग नसून नारंडा गावात अवैध दारू गावात विक्री होतं असल्याने महिला मात्र संतापल्या असल्याचे चित्र दिसत आहे.
नारंडा गावातील महिलांना, लहान मुलास गावातील अवैध देशी दारू विक्री घातक ठरत आहे कारणं गावात व भर चौकात दारू विक्री होत असल्यामुळे त्यातच लहान मुलाच्या व मुलीच्या समोर दारू ची विक्री होत असल्याने त्यांच्या मनावर काय परिणाम होईल यांची जराही लाज दारू विकणाऱ्याला वाटतं नसल्याने येथील सामाजिंक वातावरण बिघडलं आहे.यावर अंकुश लावला गेला नाही तर पुढची पिढी बरबाद झाल्याशिवायराहणार नाही असेच एकूण वातावरण आहे.