Home वरोरा वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची करनूल ट्रान्समिशन लिमिटेड कडून आर्थिक पिळवणूक.

वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची करनूल ट्रान्समिशन लिमिटेड कडून आर्थिक पिळवणूक.

महावितरण कंपनीने केले हात वर,  तालुक्यातील नागरी, उखर्डा, जळका, गिरसावळी, माढेळी, वंधली, आमडी व निलजई येथील शेकडो शेतकरी लाभांपासून वंचित.

वरोरा :-

तालुक्यात करनूल ट्रान्समिशन लिमिटेड कडून इलेक्ट्रिक पॉवर लाईन चे काम करतांना शेतकऱ्यांच्या शेतातून तार टाकण्याचे काम सुरू होते. दरम्यान शेतकऱ्यांच्या शेतातील मोजमाप करून त्यात किती जागा यासाठी व्यापली आहे हे बघून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याची घोषणा करण्यात आली होती व ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून ही टॉवर लाईन जाते हे त्यां शेतकऱ्यांना 45 दिवसात ठराविक मोबदला देण्याची हमी करनूल ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनी व्यवस्थापक यानी दिली होती त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टॉवर लाईन टाकण्याचे काम कंपनीला करू दिले पण आज पांच महिने लोटून सुद्धा तालुक्यातील नागरी, उखर्डा, जळका, गिरसावळी, माढेळी, वंधली, आमडी व निलजई येथील शेकडो शेतकरी त्यांना मिळणाऱ्या लाभांपासून वंचित आहे. दरम्यान कंपनी चे अधिकारी शेतकऱ्यांना मोबदला देण्यास टाळाटाळ करीत आहे व तारखेवर तारीख देत आहे.

दिनांक 11/3/2023 ला झालेल्या करारनाम्यानुसार कलम 68 आणि 164 चीज कायदा 2003 भारतीय टेलीग्राफ जंक्ट 1885 आणि सीईए (सेफ्टी अँड इलेक्ट्रिक सप्लाय मार्गदर्शक तत्वांच्या 2010 च्या भाग -2 सह इतर नियमानुसार शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी करार करण्यात आला परंतु मागील पांच महिन्यांपासून  शेतकऱ्यांना कंपनी चे लोकं झुलवत आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांनी कंपनी च्या अधिकाऱ्यांविरोधात एल्गार पुकारला असून कंपनीच्या कार्यालयासमोर घंटानांद आंदोलन करण्यात येईल असा इशारा मोहित हिवरकर यानी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here