Home वरोरा नवोदित कवी  शिक्षक नीरज आत्राम यांची नागपूर विभागीय उपाध्यक्षपदी  निवड.

नवोदित कवी  शिक्षक नीरज आत्राम यांची नागपूर विभागीय उपाध्यक्षपदी  निवड.

काव्यप्रेमी शिक्षक मंच या साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा विदर्भात वावर नव्या कवींना चालना देणारा.

वरोरा प्रतिनिधी :-

विदर्भात साहित्यिक आणि कलाकार यांचा मोठा वर्ग आजही मुख्य प्रवाहापासून दूर आहे कारणं विदर्भात याबाबत अशी कुठलीही मोठी संस्था किंव्हा अकॅडेमी नाही पण अशा परिस्थितीत नवोदित कवींना व्यासपीठ निर्माण करून देण्यास “काव्यप्रेमी शिक्षक मंच”ही नोंदणीकृत साहित्य क्षेत्राला वाहिलेली संस्था कार्यरत आहे व त्यां संस्थेचा प्रसार विदर्भात सर्वदूर होतं आहे. अशातच वरोरा आनंदवन येथील एक नवोदित कवी व शिक्षक नीरज आत्राम यांची काव्यप्रेमी शिक्षक मंच नागपूर विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील शिक्षक यांच्यातील सुप्तगुण,व कलेला वाव देण्यासाठी अग्रेसर आहे.नवोदित कवी,लेखकांना प्रोत्साहन देऊन विचारपीठ निर्माण करण्याचा उदात्त हेतू आहे.शिक्षकांमध्ये असलेला कवीमन बाहेर काढण्याचे कार्य काव्यप्रेमी शिक्षक मंचद्वारे केल्या जाते.नुकतेच काव्यप्रेमी शिक्षक मंच नागपूर विभागाच्या उपाध्यक्षपदी कवी,नीरज आत्राम यांची निवड काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे राज्याध्यक्ष आनंद घोडके सर, व राज्य सचिव कालिदास चवडेकर सर यांनी केलेली आहे.कवी,नीरज आत्राम वरोरा जि.चंद्रपूर यांच्या निवडीबद्दल शैक्षणिक,साहित्यिक, सामाजिक अश्या सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Previous articleधक्कादायक :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पचा ऑनलाइन तिकीट घोटाळा वनअधिकाऱ्यांच्या मर्जीने ?
Next articleवरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची करनूल ट्रान्समिशन लिमिटेड कडून आर्थिक पिळवणूक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here