News Now
Home > चंद्रपूर > धक्कादायक :- आता महापौर राखी कंचर्लावार यांच्या पतीचे भानापेठ येथील साई सुमन अपार्टमेंट सुद्धा बेकायदेशीर ?

धक्कादायक :- आता महापौर राखी कंचर्लावार यांच्या पतीचे भानापेठ येथील साई सुमन अपार्टमेंट सुद्धा बेकायदेशीर ?

अपार्टमेंट बांधकामाला नगररचना विभागाची परवानगी नसल्याची माहिती, पार्किंग जागेवर सुद्धा बांधकाम ?

चंद्रपूर मनपाचा भ्रष्ट कारभार भाग – १०

चंद्रपूर मनपा च्या वादग्रस्त महिला महापौर राखी कंचर्लावार यांचे व त्यांच्या नातेवाईकांचे मोक्याच्या जागेवरील अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकाम हे भाजप पक्षाच्या चंद्रपूर महानगर पालिकेतील सत्तेला सुरुंग लावणारी घटना असून अनेक राजकीय पक्षाच्या नगरसेवकांची वक्रद्रुष्टी आता कोणत्या स्तरांवर जाईल आणि भाजप मधे बंडाळी होईल हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असणारी मंडळी आता त्या क्षणाची वाट बघत असल्याची सुद्धा चर्चा रंगत आहे.
महापौर राखी कंचर्लावार यांचे पती भानापेठ येथील नगरसेवक असताना काही वर्षापूर्वी

त्यांनी साई सुमन नावाचे अपार्टमेंट बांधकाम केले होते, मात्र पालिका नगर रचनाकार विभागाने जो प्रस्ताव संजय कंचर्लावार यांनी सादर केला त्या प्रस्तावाला मंजुरी दिली नव्हती, परंतु तरीही बळजबरीने त्यांनी साई सुमन अपार्टमेंटचे बेकायदेशीर बांधकाम केले एवढेच नव्हे तर त्या अपार्टमेंटसाठीची पार्किंगची जागा सुद्धा सोडली नसल्याने साई सुमन अपार्टमेंटच बेकायदेशीर असल्याचे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे भाजप चे जेष्ठ नेते तथा माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे नेमके या संदर्भात कोणता निर्णय घेतात याबद्दल शहरवासियांना उत्सुकता लागली असली तरी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आता या संदर्भात राज्यात त्यांची सत्ता असल्याने कंचर्लावार पती पत्नीचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी  समोर येऊन काँग्रेस मधून भाजप मधे गेलेल्या कंचर्लावार यांचा बदला घेतील का ? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे, पण मनपा च्या सत्तेत आपली हुकूमशाही चालविणाऱ्या कंचर्लावार यांच्या ढिगभर अवैध बांधकाम व नातेवाईकांचे बांधकाम पडणार कधी ? व त्यांना पदावरून हटविणार का ? की पुन्हा त्यांना भाजप कडून बळ देवून निरपराध गोरगरीब व छोट्याशा जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांची घरे व बांधकामे तोडण्यासाठी पुन्हा त्या पदांवर ठेवल्या जाईल हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Top