Home कोरपणा *हिरापूर येथे जि.प.अध्यक्षा सौ.संध्याताई गुरुनुले यांचे हस्ते विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण

*हिरापूर येथे जि.प.अध्यक्षा सौ.संध्याताई गुरुनुले यांचे हस्ते विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण

 

कार्यकाळ संपुस्टात आलेल्या ग्राम पंचायत कमिटी ला दिला निरोप

जिल्हा परिषद आजी माजी अध्यक्षांची व सभापती यांची उपस्थिती

हिरापूर ता.कोरपना,जिल्हा चंद्रपूर येथे ग्राम पंचायत हिरापूर यांचे सौजण्याने दिनांक 7.9.2020 सोमवार ला 12 वाजता निरोप समारंभ ,भूमिपूजन,व लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणून सौ.संध्याताई गुरुनुले अध्यक्षा जिल्हा परिषद चंद्रपूर ह्या होत्या तर
कार्यक्रमाचे अध्यक्ष:मा.श्री.देवरावदादा भोंगळे माजी अध्यक्ष तथा सदस्य जि.प.,जिल्हाध्यक्ष भाजप हे होते.

विशेष अतिथी: मा.श्री.सुनिलभाऊ उरकुडे,सभापती कृषी व पशुसंवर्धन विभाग जि.प. चंद्रपूर,शिवाजी सेलोकर,संजय मुसळे,अरुण मडावी,पुरुषोत्तम भोंगळे,विजय रणदिवे, ओम पवार सत्कारमूर्ती गौतमजी धोटे,सौ.शिलाताई धोटे हे होते.

मुदत संपलेल्या ग्राम पंचायत हिरापूर येथील ग्राम पंचायत कमिटी ला सत्कार करून निरोप देण्यात आला. भूमिपूजन व झालेल्या कामाचे लोकार्पण करण्यात आले.

जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी आपल्या उद्घाटनिय भाषणातून 5 लाखाची नवी समशनंभूमी शेड देण्याचे व हिरापूर ग्राम पंचायतीच्या पदाधीकार्यांच्या पाठीशी विकासासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहो असे सांगितले.
तसेच अध्यक्षीय भाषणात देवराव दादा भोंगळे यांनी सांगितले की तरुण नेतृत्व निवडले तर गावाच्या विकासाचा रथ जलद गतीने पुढे जातो तरुण पुढारी धळपड करून विकासनिधी खेचून आणू शकतो असे सांगितले मागील 5 वर्षाच्या कार्यकाळात सर्व मार्गाने हिरापूर गावाला 1 कोटी 76 लाख व त्यापेक्षा अधिक निधी विविध मार्गाने उपलब्ध झाला असे प्रास्ताविक भाषणात सरपंच प्रमोद कोडापे,यांनी सांगितले व यापुढेही अविरत गावाच्या सेवेसाठी व विकासासाठी प्रयत्नशील राहू असे म्हटले..

यावेळी सर्व ग्राम पंचायत सदस्य ,उपसरपंच शिवाजी बोढे रवी आत्राम,शांताबाई टिपले,पद्मा कोडापे,वेशाली पावडे,शोभा मडचापे ,ग्रामसेवक, ताजने , पुष्प गायकवाड, उषा वाघमारे,नानाजी लोडे,वाघमारे गुरुजी, भास्कर विधाते, पावडे,अरुण काळे,गिरजनाथ खणके,भाऊजी बोढे, सुधाकर बोढे,सोमा जोगी, भगवान बोबडेआदी उपस्थित होते.

Previous articleधक्कादायक :- आता महापौर राखी कंचर्लावार यांच्या पतीचे भानापेठ येथील साई सुमन अपार्टमेंट सुद्धा बेकायदेशीर ?
Next articleसंतापजनक :- वरोरा भद्रावती कोविड सेंटर मधे निकृष्ट दर्जाचे जेवण व असुविधा यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण त्रस्त ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here