News Now
Home > भद्रावती > संतापजनक :- वरोरा भद्रावती कोविड सेंटर मधे निकृष्ट दर्जाचे जेवण व असुविधा यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण त्रस्त ?

संतापजनक :- वरोरा भद्रावती कोविड सेंटर मधे निकृष्ट दर्जाचे जेवण व असुविधा यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण त्रस्त ?

 

शासनाच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱ्या नगरपरिषद प्रशासन व आरोग्य विभागाचा भ्रष्ट कारभार आला समोर.

वरोरा /भद्रावती प्रतिनिधी :-

सद्ध्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यांना ज्या कोविड सेंटर मधे ठेवण्यात येत आहे त्यामधे निकृष्ट दर्जाचे जेवण व राहण्याची व इतर असुविधा असल्याच्या तक्रारी सामाजिक माध्यमातून समोर येताना दिसत आहे, नुकतीच चंद्रपूर महानगर पालिका द्वारे शहरात कोविड सेंटर मधे मोठ्या प्रमाणात असुविधा व निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रार सामाजिक माध्यमातून राजेश बेले यांनी केली होती मात्र त्या तक्रारी वरून चंद्रपूर महानगर पालिकेने आपल्या प्रशासन व्यवस्थेत बदल करणे अपेक्षित असताना उलट सामजिक कार्यकर्ते राजेश बेले यांचे बेकायदेशीर अतिक्रमण असल्याचे ठरवून घराचे बांधकाम तोडले त्यामुळे चंद्रपूर मनपा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत असताना आता वरोरा व भद्रावती नगरपरिषद प्रशासनातर्फे सुद्धा अशाच प्रकारची असुविधा व निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारी सामजिक माध्यमातून समोर येत असल्याने कोविड सेंटर च्या नावाखाली महानगर पालिका व नगरपरिषद प्रशासन भ्रष्टाचार करीत आहे का ? हा प्रश्न जनता विचारू लागली आहे.

वरोरा नगरपरिषद आरोग्य विभाग विरोधात एका मुलींनी आपली कोविड सेंटर मधील आपबीती विडिओ बनवून व तो सामजिक माध्यमांवर टाकून सांगितली व स्वत तिने संबंधित डॉ।देवतळे यांच्याकडे तक्रार केली परंतु तिचे काहीएक न ऐकता उलट तिला अपमानित केल्याचे ती सांगते तर भद्रावती मधील कोविड सेंटर मधे एका मुलाने कसे निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते व त्यांना दिलेल्या भाता मधे कशा अळ्या आहे याचे प्रत्यक्ष दाखवले. खरं तर ह्या पॉझिटिव्ह किंव्हा कोरोनटाइन केलेल्या व्यक्तींच्या तक्रारी मनोरंजन नाही तर कोरोना च्या नावावर सरकारी पैशाची उधळपट्टी आहे आणि संकटाच्या या घडीला आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ती बाब दंडनिय आहे व संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार पोलिस कारवाई सुद्धा होऊ शकते, परंतु महानगर पालिका प्रशासन असो की नगरपरिषद प्रशासन असो यांची सुविधा व अन्न पुरवठा करणाऱ्या संबंधित ठेकेदार यांच्या सोबत असलेली अर्थपूर्ण युती आणि आघाडी यामुळे हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असल्याने बिचाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह व कोरोनटाईन केलेल्या व्यक्तिंना १० दिवस मोठ्या यातना सहन कराव्या लागतात त्यामुळे या गंभीर प्रकारावर आळा घालणे फार आवश्यक झाले आहे. मात्र या प्रकरणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.

Leave a Reply

Top