उमेश कांबळे (ता. प्र.) भद्रावती
सध्या कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे मात्र याच काळात रेती उत्खनन सध्या मोठ्या जोमात सुरु आहे. असाच एक प्रकार तालुक्यातील कोच्ची येथील शेत शिवारात स्मशान भूमी जवळ सुरु असून तेथील असलेल्या घाटावरून जेसीबीच्या मदतीने रात्रौला अवैध रेती उत्खनन करून त्याचा साठा स्मशान भूमीजवळ करून ठेवल्या जातो व नंतर त्याचा विल्हेवाट लावल्या जातो पण हे रेतीचे ढिगारे नेमके आहे तरी कोणाचे ? असा प्रश्न तेथील नागरिकांना पडला आहे. त्यामुळे अवैध रेती तस्करी राजरोसपणे अशीच सुरु राहील का व शासनाचा महसूल बुडविला जाणार का ? हा प्रश्न अधिक गंभीर बनला असून येणाऱ्या काळात महसूल प्रशासनाने लक्ष दिले नाही तर जाण्यायेण्याच्या मार्गावर खड्डे तर होतीलच पण इथे वाळू माफीयांची दादागिरी वाढेल, या मार्गावरील स्मशान भूमी रोडवर जाताना पावसाळ्यात या अवैध रेती चे चालणारे हायवा आणि ट्रॅक्टर मुळे चिखलाचे साम्राज्य पसरलेले असते, सोबतच त्यामुळे प्रेते जाळण्यासाठी अंतिम यात्रेचे वेळेस त्याना मोठा त्रास सहन करावा लागतो . चिखलातून कसे-बसे सरळ मार्गाने स्मशान भूमी वर जावे लागते, यावर प्रशासनाची कडक भूमिका घेवून वाळू माफियाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.