Home चंद्रपूर लाखोची अफरातफर करणाऱ्या दुर्गा महिला बचत गट अध्यक्षा हर्षा ठाकरे वर कडक...

लाखोची अफरातफर करणाऱ्या दुर्गा महिला बचत गट अध्यक्षा हर्षा ठाकरे वर कडक कारवाई करा,

 

दुर्गा महिला बचत गटाच्या महिलांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी, वरोरा पोलीसांचे आरोपीला सरक्षण असल्याचा आरोप.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

दुर्गा महिला बचत गटाच्या अध्यक्षा हर्षा ठाकरे यांनी आपल्या सदस्य असलेल्या एकूण 25 महीला सदस्यांचे संपूर्ण पाच वर्षात जमा झालेली रक्कम हडप करून फसवणूक केल्याने पिडीत महिलांनी पत्रकार परिषद घेवून दुर्गा महिला बचत गटाच्या अध्यक्षा वर्षा ठाकरे यांच्या विरोधात गुंतवणूकदार सरक्षण अधिनियम अंतर्गत कारवाई करून आम्हा गरीब महिलाचे पैसे देण्यात यावे अशी मागणी दुर्गा बचत गटाच्या महिलांनी केली,

सन 2010 ला दुर्गा महिला बचत गटाची स्थापना करून सदस्य महिलांनी प्रत्येकी दरमहा 200/- रुपये अध्यक्षा असलेल्या गैरअर्जदार हर्षा ठाकरे या महिलेकडे जमा करित होत्या. सन 2016 ला पाच वर्ष झाल्याने सदर बचत गट बंद करण्यात आला व प्रत्येक महिला सदस्यांना त्या बचत गटात गुंतवलेली लाखोची रक्कम अध्यक्षा गैरअर्जदार महिलेकडे सदस्य महिलांनी मागीतली, पण मी तुमचे पैसे व्याजाने दुसऱ्यांना दिले, पुढच्या महिण्यात तुमचे पैसे देतो, मला वेळ द्या वगैरे बहाणे करुन एकूण 25 महिलांचे पैसे परत केले नाही. त्यातच एकुण 14 महिलांनी एकत्र येऊन आम्हचे पैसे परत मिळावे म्हणून सन 2016 पासून प्रयत्न करीत आहे, पण गरीब महिलांचे जवळपास 4 लाख 70 हजार रुपये जे महिलांनी कामावर जाऊन व घाम गाळून कमावले ते पैसे वर्षा ठाकरे या महिलेने ते पैसे बचत गटाच्या महिलांना व्याजाने न देता परस्पर दुसऱ्या लोकांना 5 ते 10 टक्के व्याजाने त्या महिलेने दिले व त्याचे व्याज ती महिला घेत आहे, जर तिला ह्या सदस्य महिला पैसे मागण्यासाठी गेल्या तर ती अश्लील भाषेत शिवीगाळ करते व जीवे मारण्याची धमकी देते त्यामुळे सदस्य महिलांनी
वरोरा पोलीस स्टेशन येथे 14 महिला सदस्यांनी तक्रार केली पण पोलिसांनी वर्षा ठाकरे वर मोठी कारवाई न वरोरा पोलीसांनी IPC सेक्शन 406 अंतर्गत गुन्हा दाखल केला ज्या पासून महिलांना न्यायालयात लवकर न्याय मिळू शकत नाही व आरोपी महिलांची सुटका होऊ शकते, मात्र ज्या सदस्य महिलांनी मोठया श्रमाने मुलींच्या लग्नाकरता, घर बांधकामा करीता व इतर कामाकरीता जे पैसे बचत
गटात गुंतवले ते पेसे सदर कलमान्वये जर गैरअर्जदार महिलेकडून मिळत नसेल तर बिचाऱ्या गरीब महिलांवर हा एक प्रकारे अन्यायच होईल. त्यामूळे पैशाची अफरातफर करणाऱ्या हर्षा ठाकरे या महिलेवर गूंतवणुकदार सरक्षण अधिनियम या कार्द्याअंतर्गत गुन्हा नोंद करावा व गरीब महिलांचे 4 लाख 70 हजार रुपये हर्षा ठाकरे या महिलेकडून बचत गटाच्या महिलांना परत मिळावे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देऊन चंद्रपूर येथे श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत मागणी करण्यात आली,
खरं तर बचत गटाच्या महिलांच्या श्रमाच्या पैशावर वर्षा ठाकरे यांनी घर बांधून किराणा दुकान थाटले व व्याजाचे पैसे ती मिळवित आहे, त्यामुळे तिच्यावर वचक बसावी व पुन्हा ती महिला कुणाची फसवणूक करणार नाही यासाठी तीचेवर कडक कारवाई करण्याची मागणी सदस्य महिलांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here