Home चंद्रपूर महत्वाची बातमी :- उद्या काँग्रेस सहित विविध पक्षातर्फे भारत बंदला पाठिंबा,

महत्वाची बातमी :- उद्या काँग्रेस सहित विविध पक्षातर्फे भारत बंदला पाठिंबा,

 

चंद्रपूर शहरातील गांधी चौकातून निघणार रैली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू आहे. पण अद्याप या बैठकांमधून तोडगा निघालेला नाही. हळूहळू आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त होताना दिसत असून विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळीदेखील लवकरच या मुद्द्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. तसेच, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. परंतु, गुजरात मधे हे आंदोलन नाही असे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी जाहीर केले असले तरी देशाच्या सर्व राज्यात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता असताना आता चंद्रपूर जिल्ह्यात उद्या भारत बंद च्या दिवशी शहरातील गांधी चौकातून सकाळी ११ वाजता भाजप वगळता सर्व राजकीय पक्षातर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आहे,

Previous articleआरोग्य वार्ता :- ५४ गावातील ८हजार कुटुंबाचे होणार आरोग्य सर्वेक्षण.
Next articleशेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मनसे व प्रहार तर्फे रस्तारोको आंदोलन !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here