Home वरोरा आरोग्य वार्ता :- ५४ गावातील ८हजार कुटुंबाचे होणार आरोग्य सर्वेक्षण.

आरोग्य वार्ता :- ५४ गावातील ८हजार कुटुंबाचे होणार आरोग्य सर्वेक्षण.

 

खांबांडा परिसरात कुष्ठरूग्ण क्षयरोग सर्वेक्षण मोहीम सुरू.

तालुका प्रतिनिधी (मनोहर खिरटकर)

तालुक्यातील कोसरसार प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वतीने कुष्ठरूग्ण व क्षयरोग सर्वेक्षण मोहीमेस प्रांरभ करण्यात आला. तालुक्यातील कोसरसार येथील प्राथमिक आरोग्य केन्दाअंतर्गत खाबांडा, भटाळा,टेमुर्डा,सावरी, या उपकेंद्रातील ५४ गावातील ८२४८ कुंटुबातील एकुण ३७७४२लोकांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहेत. यासाठी ४०२पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.१ डिसेंबर ते१६ डिसेंबर पर्यंत पहिला टप्पा असुन यात आरोग्यसेवक ,आशावर्कर यांच्यामार्फत दररोज२०कुंटुबाचे सर्वेक्षण करण्यात येत असुन त्यात व्यक्तीच्या शरीरावरील बधीरचट्टा ,तेलकट आणि खाज येणारा चट्टा असल्यास त्याची तपासणी उपकेन्द्रस्तरावर करून उपचार करण्यात येणार आहेत. तर क्षयरुग्ण मोहिमेत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला,वजनात घट आदि लक्षणे असणाऱ्या व्यक्तीची तपासणी करण्यात येणार असल्याचे प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश आवारी यांनी सांगितले. वेगवेगळ्या घरातील कुंटुबाचा सर्वे करताना पाळायचे गांभीर्य व घ्यावयाची काळजी याबाबतहि त्यांनी मार्गदर्शन केले.या उपक्रमाबाबत कोसरसार आरोग्य केंन्द्रात ५४गावाच्या ४०२ पथकातील आशावर्कर व आरोग्यसेवक यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी आरोग्यसेवक चक्रधर पवार , डॉ देवतळे,आशावर्कर विद्याताई भोयर तथा आरोग्य सहाय्यक  बालपांडे, व  चिंवडेसह आदि कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here