Home वरोरा धक्कादायक :- अवैध रेती तस्करीतून ट्रक्टरच्या धडकेने एकाचा म्रुतु, एक घायल,

धक्कादायक :- अवैध रेती तस्करीतून ट्रक्टरच्या धडकेने एकाचा म्रुतु, एक घायल,

मनसेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी तहसील कार्यालयाला ठोकले कुलूप.

वरोरा प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांच्या नेत्रुत्वात मागील काही दिवसापासून अवैध रेती तस्करी करणाऱ्या विरोधात सतत आंदोलन सुरू असून मागील काही दिवसापूर्वी त्यांनी टॉवरवर चढून विरूगिरी आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दखल घेवून उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी वरोरा तालुक्यातील रेती घाटावर दक्षता पथक चौकी द्वारे तयार केले होते पण त्यानंतर सुद्धा अवैध रेती तस्करी थांबली नाही, पर्यायाने ट्रक्टर द्वारे रेती शहरात खुलेआम विकल्या जात आहे. अशाच एका ट्रक्टर ने सकाळी वरोरा शहरातील अभ्यंकर वार्ड येथे दोन बाईकस्वाराना जोरदार धडक दिल्याने प्रवीण खोब्रागडे नावाच्या गंभीर जखमी मुलाचा चंद्रपूर मधे नेताना म्रुतु झाला तर दुसरा मुलगा मंथन बावने याला रुग्णालयात भरती करण्यात आले.

या प्रकरणाची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी घेतली व ज्या उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी अवैध रेती तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली नसल्याने आजही रेती तस्करी होत आहे हे स्पष्ट झाल्याने त्यांनी आपल्या समर्थका सह तहसीलदार यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकून निषेध केला दरम्यान प्रहार चे किशोर डुकरे यांच्या सह उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन निषेध केला. या प्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, शहर अध्यक्ष शरद मडावी, शहर उपाध्यक्ष मोहसीण सय्यद व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकरणी ट्रक्टर चालक मालक यांच्यावर वरोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरोरा पोलीस पोलीस करीत आहे.

Previous articleखळबळजनक :- एका अभियंत्याच्या त्या अश्लील विडिओ स्टेट्सने उडाली खळबळ ?
Next articleआरोग्य वार्ता :- ५४ गावातील ८हजार कुटुंबाचे होणार आरोग्य सर्वेक्षण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here