Home Breaking News धक्कादायक :- वणी येथे विवाहित महिलेचा दगडाने ठेचून खून ?

धक्कादायक :- वणी येथे विवाहित महिलेचा दगडाने ठेचून खून ?

 

खून नेमका कुणी केला ? याचा पोलीस घेताहेत शोध.

वणी प्रतिनिधी :-

आजकाल खुनाचे प्रमाण वाढले असून वैवाहिक जीवनात कौटुंबिक हिंसाचार सुद्धा वाढला आहे, वणी शहरातील पटवारी कॉलनी राहणाऱ्या 32 वर्षीय विवाहितेचा वांजरी शिवारातील शेतात खून झाल्याची घटना सकाळी उजेडात आल्याने एकच खळबळ उडाली आहे,
जया मनोज आवारी असे मृत विवाहितेचे नाव असून तिचे वरोरा येथे लग्न झाले होते, मात्र गेल्या सात वर्षांपासून पती सोबत पटत नसल्याने ती आपल्या दोन मुलासह शहरातील पटवारी कॉलनी येथे ती किरायाने होती
दि 10 डिसेंबर ला रात्री 8 वाजताचे सुमार लगतच राहत असलेल्या मामा च्या घरी जात असल्याचे सांगून ती घरून निघाली मात्र रात्री घरी परतली नाही. आज सकाळी वांजरी शिवारातील बडवाईक यांच्या शेतातील बंड्याजवळ तिचा मृतदेह आढळून आला याची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता रुग्णालयात नेण्यात आला दरम्यान प्रेत अनोळखी असल्याने तिची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांन समोर होते पण काही वेळातच तिची ओळख पटल्याने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे तिच्या डोक्यावर दगडाने जोरदार प्रहार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here