Home वरोरा मनसे विजय :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेती तस्करी विरोधातील आंदोलनाला मोठे यश.

मनसे विजय :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेती तस्करी विरोधातील आंदोलनाला मोठे यश.

 

जप्त केलेला रेती साठा घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार स्वस्त दरात.

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यात मागील अनेक वर्षापासून रेती तस्करी ही नदी नाले तथा वन विभागातील बंधाऱ्यातून व नाल्यातून सर्हासपणे होत होती. ह्या रेती चोरी प्रकरणात महसूल प्रशासन व वन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा छुपा पाठिंबा असल्यानेच रेती तस्कर हे कोट्यावधी रुपयाचा शासनाचा महसूल बुडवून चढ्या भावाने रेती विकून मालामाल होत होते, मात्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजना, रमाबाई आवास योजना व शबरी आवास योजना मधील लाभार्थ्यांना 1500 रुपयाची रेती ही 7 ते 8 हजार रुपयांनी खरेदी करावी लागत होती पर्यायाने घरकुल बांधकाम करणे हे घरकुल लाभार्थ्यांना कठीण होऊन बसले होते. अशातच जप्त झालेली रेती ही कुणीतरी रेती माफिया हेच मोठी बोली बोलून शासनाकडून लिलावात घ्यायचे व त्याच्या टीपी वरून अवैध रेती तस्करी करायचे त्यामुळे हा व्यवहार बिनबोभाट पद्धतीने सतत सुरू होता.

या संदर्भात पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, तालुका अध्यक्ष वैभव डहाणे व मनसे पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार व वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देवून रेती तस्करी त्वरित थांबवा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल. पण महिना लोटून गेल्यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग आली नव्हती व उलट दोन अनोळखी व्यक्तींनी मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांच्या हॉटेल वर जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे रेती तस्करी मधे महसूल प्रशासनाचा हात असल्याचे समोर आल्याने वैभव डहाणे यांनी तहसील कार्यालयातील टॉवर वर चढून वीरुगीरी आंदोलन केले होते, या आंदोलनात मनसेचे नेते रमेश राजूरकर, जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या पुढाकाराने व मागण्या मान्य झाल्याने आंदोलन परत घेण्यात आले व त्या आंदोलनाची दखल महसूल प्रशासनाने घेऊन रेती घाटावर चौक्या लावल्या होत्या परंतु तरीही रेती तस्करी थांबली नाही व अभ्यंकर वार्डात दोन युवकांना रेती तस्करी करणाऱ्या ट्रक्टरनी जोरदार धडक दिल्याने प्रवीण खोब्रागडे ह्या 21 वर्षीय युवकाचा म्रुतु झाला होता त्यामुळे जनतेत महसूल प्रशासनावर मोठा आक्रोश निर्माण झाला होता अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी तहसील कार्यालयाला कुलूप ठोकून महसूल प्रशासनाला धारेवर धरले होते. विशेष म्हणजे वरोरा येथे पहिल्यांदाच तहसील कार्यालयाला कुलूप लावल्याची घटना घातल्याने ही वार्ता संपूर्ण जिल्ह्यात पोहचली पर्यायाने महसूल प्रशासन हे या प्रकरणी दोषी असल्याने प्रवीण खोब्रागडे या युवकांच्या म्रुतु प्रकरणी महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसे कडून सुरू होती व जप्त केलेली रेती ही घरकुल लाभार्थ्यांना देण्यात आली नाही तर आत्मदहन करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली होती त्यामुळे उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी या प्रकरणी पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासह मंडळ अधिकारी व पटवारी यांची बैठक घेऊन जप्त केलेली जवळपास 200 ब्रॉस रेती ही घरकुल लाभार्थ्यांना देण्याची घोषणा केली. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना आता रेती शासकीय स्वस्त दरात मिळणार असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लढ्याला मोठे यश प्राप्त झाले आहे. या संदर्भात मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या नेत्रुत्वात पत्रकार परिषद घेऊन मनसेच्या आंदोलनाची भूमिका मांडण्यात आली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे. जिल्हा सचिव विनोद सोनटक्के. तालुका अध्यक्ष वैभव डहाणे. शहर अध्यक्ष शरद मडावी व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते ….

Previous articleमनसे धमाका:- माजरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश,
Next articleधक्कादायक :- वणी येथे विवाहित महिलेचा दगडाने ठेचून खून ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here