Home वरोरा सच्चर कमेटी च्या शिफारशी लागू करा, मुस्लिम समाजाची तहसीलदार द्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

सच्चर कमेटी च्या शिफारशी लागू करा, मुस्लिम समाजाची तहसीलदार द्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

 

वरोरा तहसीलदार यांना छोटूभाई शेख व इतर कार्यकर्त्यांनी दिली निवेदन

वरोरा प्रतिनिधी :-

स्वातंत्र्याचा काळापासून मुस्लिम समुदाय शिक्षण आरोग्य व इतर क्षेत्रात पूर्णतः मागासलेला असल्याने राजेंद्र सच्चर समिती केंद्र शासनाकडून नेमण्यात आली त्या सच्चर कमेटी ने मुस्लिम समाजाला शैक्षणिक क्षेत्रासोबतच प्रशासकीय सेवेत व राजकीय आरक्षण देण्यात यावे अशा शिफारशी केंद्र शासनाकडे केलेल्या होत्या मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारने व विद्यमान भाजप सरकारने यावर अमलबजावणी न करता उलट हिंदू मुस्लिम असा भेदभाव सुरू केला पर्यायाने मुस्लिम समाज आपल्या मूलभूत अधिकारापासूनवंचित असून जर सरकार मराठा समाजाला व ब्राम्हण समाजाला आरक्षण देण्यास तयार आहे तर मग सच्चर कमेटी ने मुळात मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचे सरकारला सुचविले असल्याने मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यास सरकार का विचार करीत नाही ? हा गंभीर प्रश्न घेऊन छोटूभाई शेख यांच्या नेत्रुत्वात यानी वरोरा येथे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.

डॉक्टर सच्चर व रहमान समितीच्या शिफारशी व हायकोर्टाचे निर्णयानुसार इतर समाजा बरोबर मुस्लिम समाजाला शैक्षणिक नोकरी व राजकीय क्षेत्रात दहा टक्के आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस आहे मात्र सरकार ती द्यायला तयार नाही आणि म्हणून या मागणीकरित दिनांक 11 डिसेंबर 2020 ला संपूर्ण महाराष्ट्रातील तालुका व जिल्हा स्तरीय निवेदन देवून मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून वरोरा येथील तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदन पाठवण्यात आले यावेळी निवेदन सादर करताना सार्वजनिक बांधकाम सभापती वरोडा तथा जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया कौमी तांझीम. मोसिम पठाण फारूक शहा कैसर शहा नाज भाई इस्माईल सरदार शेख शब्बीर शेख व इतर मुस्लिम बांधव उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here