Home चंद्रपूर धक्कादायक :- गुन्हेगारीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्हा एक क्रमांकावर जाण्याची चिन्हे,

धक्कादायक :- गुन्हेगारीत महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्हा एक क्रमांकावर जाण्याची चिन्हे,

 

मी पोलीसमधे असल्याची लाज वाटते असे चंद्रपूरमधील पोलीस अधिकारी म्हणतो तेंव्हा?

लक्षवेधी ;-

ज्या राज्याला राजे शिवछत्रपतीचा इतिहास आहे त्या राज्यात मोगलांना सळो की पळो करून सोडणाऱ्या मावळ्यांना आता या राज्यातील मोगलांच्या भूमिकेत असणाऱ्या दरोडेखोर, चोर, लूचक्के, गुंड,व बदमाश यांना पोलिसांकडून हुसकावून लावता येत नाही हीच खरी शोकांतिका असून राज्यातील पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

खरं तर देशभरात जो गुन्हेगारीचा केंद्राकडून रिपोर्ट प्रकाशित होतो त्या सन 2016 च्या रिपोर्ट मधे गुन्हेगारीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्रात मोठे गुन्हे घडतात ही परिस्थिती आहे. मात्र कधी काळी चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय म्हणून ओळखला जायचा आता तो गुन्हेगारीत पुणे, ठाणे व नागपूर नंतर चौथ्या स्थानावर आहे की काय? असे चित्र दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जेव्हापासून दारूबंदी झाली तेव्हपासून चोर, बदमाश गुंड हे दारू तस्करीत उतरले शिवाय जिल्ह्यातील कोळसा खाणीत सुद्धा दादागिरी करणाऱ्या कोळसा माफियांच्या टोळ्यांनी  आपल्या गुंडगिरीचा फास आवळल्याने दोन गटात हाणामारी व खुनी हल्ले सुरू झाले व कित्तेकाचें खून सुद्धा झाले, याचे ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास राजुरा येथील कोळसा ट्रांसपोर्ट कंपनीचे राजू यादव यांचा रिव्हाल्वरने भरदिवसा झालेला खून व त्या अगोदर बल्लारपूर येथे झालेला सूरज बहुरीया यांचा खून, मध्यंतरीच्या काळात वणी वेकोली एरियात कोळसा माफियांनी रिव्हाल्वरचा धाक दाखवून कोळसा चोरीचा केलेला प्रकार असो, आपसी रंजिश करून मनोज अधिकारी यांचा सुनियोजित पद्धतीने केलेला खून असो, की आता आत्ताच घूग्गूस येथे अभियंता शुभम फुटाणे यांचा खून असो हे सर्व खून व दहशत पसरवून प्रशासनाचे धिंडवडे काढण्याचे जे प्रकार सुरू आहे ते पोलिसांच्या अकार्यक्षमतेचे धोत्यक आहे. कारण जिल्ह्यात झालेल्या दारूबंदी नंतर पोलीस प्रशासनाचा अवैध धंदेवाईक यांच्यावरचा अंकुश पूर्णतया सैर झाला असल्याने अवैध धंद्यातून येणारा पैसा यामुळे पोलीस आता कडक शिस्तीत दिसत नाही, नव्हे अवैध धंदेवाईक यांचे ते जणू सरक्षण करीत असल्याने काही पोलीस अधिकारी कर्मचारी म्हणतात की पोलीस असल्याची मला लाज वाटते.

चंद्रपूर जिल्ह्यात कोण दारूचा मोठा व्यवसाय करतो व त्यापासून जिल्ह्यातील राजकीय व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना किती रसद पोहचवीली जाते हे जाहीर आहे, पण मुळात पोलीस प्रशासन हे जणू ह्या राजकीय अवैध व्यावसायिकांच्या ताटाखालचे मांजर बनले असल्याने व जिल्ह्यात आम्ही म्हणू तो कायदा असे म्हणणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या संधीसाधू भूमिकेमुळे कायदा सुव्यवस्था बाधित होऊन पत्रकारांना सुद्धा राजकीय अवैध व्यवसायी गुंडांकडून धमक्या देणे व त्यांचेवर प्राणघातक हल्ले होत आहे. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात सद्ध्या कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न असून राजकीय दादागिरी व टोळी युद्ध यासोबतच अवैध व्यवसायी यांची पोलिसांच्या हप्तेखोरीतून वाढलेली दादागिरी यामुळे  सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे.

चंद्रपूर शहरात एक दारू तस्कर अमित गुप्ता यांनी जून-2020 मधे भिवापुर परिसरात रामनगर पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी यांचे तोंड फोडले होते तर त्या अगोदर एका पोलीस अधिकाऱ्याला दारू तस्करांनी चार चाकी गाडीची धडक देऊन खून केला होता पण तरीही पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा पोलीस प्रशासनाला कुठलाही फरक पडला नसून अवैध व्यवसायिक यांना त्यांच्याकडून मिळणारे पाठबळ व लोकप्रतिनिधी यांना अवैध व्यावसायिकांकडून होणारा फायदा यामुळे जिल्ह्यात सरक्षणकर्तेच भक्षक बनले असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठी वाढ झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे.त्यामुळे चंद्रपूर जिल्हा गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर यायला वेळ लागणार नाही अशीच एकूण परिस्थिती दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here