Home चंद्रपूर मनसे शहर अध्यक्ष यांच्यावरील गंभीर गुन्हे मागे घ्या- मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी...

मनसे शहर अध्यक्ष यांच्यावरील गंभीर गुन्हे मागे घ्या- मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांची ग्रूह मंत्र्याकडे मागणी.

दरोडा टाकणे सारख्या गंभीर गुन्ह्यात मनसे पदाधिकाऱ्यांना अडकवने म्हणजे त्या कंपनी व्यवस्थापनाच्या चुकीला साथ देणे नव्हे का?

चंद्रपूर प्रतिनिधी :–

जिल्ह्यात वेकोली क्षेत्रात होणाऱ्या माती उत्खननात व कोळसा ट्रांसपोर्ट मधे स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीय कामगार कर्मचारी यांची भरती कंपन्या घेत असल्याने स्थानिक बेरोजगार युवकांच्या हाताला मिळणारे काम परप्रांतीय हे जणू हिरावून घेत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे याची नेहमीच गंभीर दखल घेवून वेकोली प्रशासन व कंत्राटदाराला निवेदने दिल्या जाते व त्या निवेदनाची दखल घेतली नाही तर खळखट्ट्याक आंदोलन केल्या जाते असेच आंदोलन मनसे शहरअध्यक्ष मनदीप रोडे यांनी केले असता त्याचेवर पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केला असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात लक्ष घालून हा गुन्हा परत घ्यावा अशी मागणी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनात केली आहे, दरोडा टाकणे सारख्या गंभीर गुन्ह्यात मनसे पदाधिकाऱ्यांना अडकविने म्हणजे त्या कंपनी व्यवस्थापनाच्या चुकीला साथ देणे नव्हे का? असे सुद्धा त्यांनी मत  मांडले

चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळी येथे GRN कम्पनीचे ऑफिस आहे, त्या कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी केली, मात्र कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले. वास्तविक कोणत्याही कंपनीत स्थानिक कामगारांना प्रथम प्राधान्य देणे हा कायदाच आहे
मात्र संबंधित कंपनीने तो कायदा पाळला नाही, त्यामुळे त्या ठिकाणी उद्रेक झाला व तोडफोड करण्यात आली. मात्र तोडफोड केल्याप्रकरणी जो दरोडा टाकणे सारखा गंभीर गुन्हा दाखल झाला तो( 395 कलम) तो चुकीचा आहे तो मागे घेण्यात यावा अशी या गुन्ह्यातील आंदोलकांची मागणी आहे. कारण या गुन्ह्यात आरोपीना जामीन मिळणार नाही व गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्यांवर एकप्रकारे हा अन्याय आहे, या प्रकरणात वेकोली ओबी कंपनीच्या तोडफोडी नंतर मनसेचे शहर अध्यक्ष मनदीप रोडे हे कारवाईच्या भीतीने पसार झाले पण दुर्गापूर पोलिसांनी आतापर्यंत एकूण 23 जणांना या प्रकरणात अटक केली आहे, त्यात सामील असलेल्या आरोपीच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया फारच गंभीर असून त्यांचा रोष हा पोलीस प्रशासनावर आहे व ते दूर्गापूर पोलीस स्टेशन च्या दरवाजा समोर आपल्या नातेवाईकाला कधी जामीन मिळते याच्या प्रतीक्षेत आहे. पण मनसे शहर अध्यक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यावर चुकीच्या केसेस टाकून स्थानिक भुमीपुत्राची कोंडी करण्याचा जो प्रयत्न GRN वेकोली तील कंपनी करीत आहे त्या कंपनी वर सुद्धा कारवाई करा अशी मागणी सुद्धा मनसे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी निवेदनात केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here